अलिबाग- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला, अलिबाग विशेष सत्र न्यायालयाने, दहा वर्षांंची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. या शिवाय ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

सदर घटना अलिबाग तालुक्यात १३ ऑगस्ट २०१५ रोजी घडली होती. आरोपी राकेश संजय शिंदे याची १५ वर्षांच्या पिडीत मुलीशी ओळख होती. ती अल्पवयीन असल्याचे त्याला माहीत होते. मात्र तरीही त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून पालकांच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेले. नंतर शिर्डी, रांजणगाव, पुणे येथे नेऊन तीच्यावर जबरदस्तीने शारीर संबध प्रस्तापित केले. या प्रकरणी मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीसांनी तपास करून अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयात आरोपी राकेश संजय शिंदे याच्याविरोधात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी विशेष अतिरीक्त सत्र न्यायाधिश—१ श्रीमती शईदा शेख यांच्या न्यायालयात झाली. यावेळी शासकीय अभियोक्ता म्हणून स्मिता राजाराम धुमाळ यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकुण १३ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पिडीत मुलगी, वैद्य्कीय अधिकारी रमेश कराड, तपासिक अमंलदार यशवंत सोळसे, शिर्डी रांजणगाव आणि पुणे येथील लॉजचे मालक आणि फिर्यादी यांची साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजुचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शासकीय अभियोक्ता स्मिता धुमाळ यांचा युक्तीवाद ग्रा धरला. आरोपी राकेश शिंदे याला भादवी कलम ३६३, ३६६ अ, ३७६ तसेच पॉस्को कायद्यतील कलम ३ आणि ४ मधील तरतुदीं आतर्गत दोषी ठरविले, आणि दहा वर्षांंची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. याशिवाय ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. ज्यातील ३० हजार रुपये पिडीत मुलीला देण्याचे आदेशही न्यायाधिशांनी दिले.