बाबा ताजुद्दीन यांच्या वार्षिक उरुस निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावरून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. ”हेच उद्धव ठाकरेंनी केलं असतं तर भाजपाने अपप्रचार केला असता”, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, नाहीतर…” संभाजी ब्रिगेडशी युती केल्यानंतर नवनीत राणांची बोचरी टीका!

सूफी संत बाबा ताजुद्दीन यांचा १०० वा वार्षिक उरुस साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. मात्र, यावरून शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला आहे. ”हेच जर उद्धव ठाकरेंनी केलं असतं, तर यांनी हिंदुत्व सोडल, असा अपप्रचार केला असता”, असे ट्वीट मनिषा कायंदे यांनी केले आहे.

हेही वाचा – आझाद यांचा राजीनामा; काँग्रेसला जबर धक्का, राहुल गांधींवर घणाघाती टीका, नवा पक्ष काढण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूफी संत बाबा ताजुद्दीन यांचा १०० वा वार्षिक उरुस २१ ऑगस्ट ते ३ नोव्हेंबर साजरा होणार आहे. जगभरातून १५ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. कोरोना काळात निर्बंध असल्याने दोन वर्षानंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा शताब्दी वर्ष असल्याने तसेच दोन वर्षांनंतर शाही संदल निघत असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.