मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो, की कुणीही आत्महत्या करु नका. आंदोलन जिवंत राहूनच करा. आत्महत्या करुन काहीही होणार नाही. आपल्या लेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन प्रयत्न करु. १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरु करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जीवन संपवून आपल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही. आपल्या डोळ्यांदेखत समाजाला न्याय देण्यासाठी लढा असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

आपण आता न्यायाच्या जवळ आलो आहोत

२४ डिसेंबरनंतर आंदोलन होणार आहे त्याची तयारी आजपासून करायला लागा. आपण आता न्यायाच्या जवळ आलो आहोत. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात प्रत्येकाने जाऊन सांगा की आपलं साखळी उपोषण सुरु राहिलं पाहिजे. दिवाळी फराळाचे काही कार्यक्रम राजकीय नेते आयोजित करत असतात. अशा कार्यक्रमांना मराठा समाजाचे लोक या कार्यक्रमांना जातील त्यांना विचारा की आम्हाला आरक्षण कधी मिळणार. जे जाणार नाहीत त्यांचं ठीक आहे. पण जेवायला, फराळाला जाणार असाल तर आरक्षण कधी देणार हे विचारा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा समाजाच्या नेत्यांना विनंती आहे की..

मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मराठा नेत्यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित करुन घेतला पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे अशीही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. ते म्हणत आहेत मला राजकारणात यायचं आहे. मी जे काही करतो आहे ते मराठ्यांच्या लेकरांसाठी करतो आहे. जे आमचं चांगलं होऊ देत नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.