मराठा आरक्षणासाठी जालन्यात आंदोलन करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न एका महिन्याच्या आत मार्गी लावला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर आता जरांगे पाटील मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जनजागृतीचं काम करत आहेत. दरम्यान, रविवारी (१ ऑक्टोबर) नांदेड येथील सभेत जरांगे यांनी छगन भुजबळांच्या मराठा आरक्षणावरील वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राज्यातील ओबीसी नेते जे आता मराठा आरक्षणाला विरोध करतायत, त्यांना मराठा समाजाने आतापर्यंत खूप काही दिलं आहे. तुम्ही कधीतरी मराठ्यांच्या कामी याल म्हणून मराठ्यांनी छगन भुजबळांना मदत केली. आता आम्ही आरक्षण घ्यायची वेळ आली तर आम्हाला म्हणतात की ५० टक्क्यांच्या आत आरक्षण घेऊ देणार नाही. पण आम्ही ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण घेऊ.

jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!
jayant patil, ajit pawar, jayant patil crticises ajit pawar, shivaji adhalrao patil, amol kolhe, shirur lok sabha seat, election campaign, public meet, lok sabha 2024, election 2024, marathi news, ncp sharad pawar,
पिंपरी : ज्यांना पाडले, त्यांचाच प्रचार; एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये… जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

दरम्यान, जरांगे यांच्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ म्हणाले, माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. केवळ मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, असं माझं मत आहे. हे माझं एकट्याचं मत नाही. सगळेच जण याच मताचे आहेत. मी काही एकटा अशा मताचा नाही. परंतु, मला एकट्यालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही हे सगळ्यांच्या बाबतीत बोला. नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल हे लक्षात ठेवा.”

दरम्यान, भुजबळांवरील टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी स्वतःहून भुजबळांवर टीका केली नाही. ते बोलले म्हणून मी बोललो. ते बोलले मराठ्यांना आरक्षण देऊ नका, म्हणून मी बोललो. मी कोणावरच आधी टीका करत नाही. मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नाही, इकडे घुसायचंच नाही, असं ते बोलले मग मी उत्तर दिलं. भुजबळ बोलण्याआधी मी काही बोललो का?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझं उपोषण सुटल्यापासून मी कधीच कोणावर ती व्यक्ती बोलण्याआधी बोललो नाही. आधी भुजबळ बोलले मग मी त्यावर माझं मत मांडलं. आम्ही काय गप्प बसणार का? आम्हाला डिवचल्यावर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही गप्प बसणार का? तुम्हीसुद्धा गप्प बसणार नाही. त्यामुळे तुम्ही मराठ्यांना का डिवचता? तुम्ही डिवचलं म्हणून आम्ही टीका केली. ते मराठा आरक्षणाविरोधात बोलले की सामान्य मराठा तुटून पडतो.