महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, मग काहीही झालं तरीही हरकत नाही. आता माघार घेणार नाही असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी केलं आहे. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेत बोलत असताना त्यांनी मराठा तरुणांनी आत्महत्या करु नये असं आवाहन करत आपल्याला न्याय मिळणारच असंही म्हटलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“मायबाप मराठ्यांनो सरकारने आपला वेळ घेतला आहे, आपण सरकारला आपला वेळ दिला आहे. या संधीचं सोनं करा, अशी पुन्हा येणार नाही त्यामुळे एकजूट राहा. तुमच्यात जर काही मतभेद असतील तर ते बाजूला ठेवा. पण आजच्या घडीला मराठा म्हणून सगळे एकजूट व्हा, एकजूट राहा. तुमचे कुठलेही टोकाचे मतभेद असतील तरी ते बाजूला ठेवा, कारण मराठा आरक्षणाचा घास हातातोंडाशी आला आहे. १४ ऑक्टोबरला आपण सरकारला दिलेला ३० दिवसांचा वेळ संपतो आहे. त्यावर आपण त्यांना १० दिवस बोनस दिले आहेत. २४ ऑक्टोबरला ४० दिवस संपणार आहेत. आंतरवली सराटी या ठिकाणी १४ तारखेला मराठा समाजाचा कार्यक्रम ठेवला आहे. छत्रपती संभाजी नगरसह परिसरातले सगळे मराठे तिथे आले पाहिजेत. आपल्या एकीचं विराट रुप बघून सरकारला दिसलं पाहिजे.”

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..

मराठ्याच्या पोरांनी आत्महत्या करायच्या नाहीत

“आपल्याला आंदोलन करावं लागलं तर ते शांततेत करायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मराठ्याच्या पोरांनी आत्महत्या करायच्या नाहीत. आंतरवालीमध्ये येताना शांततेत या आणि शांतेत जा कारण तिथे बऱ्याच माता-भगिनी येणार आहेत.” असंही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. १४ ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमाला कुणीही गालबोट लागू द्यायचं नाही असंही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. तसंच एकजूट ठेवा, एकजूट संपवू नका असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पाच हजार पानांचा महत्त्वाचा आधार आता आपल्याकडे

आपल्याला आता पाच हजार पानांचा महत्त्वाचा आधार मिळाला आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट देण्यातली अडचणच संपली आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मंडल कमिशनने ओबीसी जाती आरक्षणात घातल्या, त्यानंतर ज्या जाती घातल्या त्या पोटजाती म्हणून घातल्या. कारण काहीही समिती वगैरे त्यासाठी केली नव्हते. आम्ही सांगितलं पोटजातींचा समावेश जर आरक्षणात केला तर मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? हा प्रश्न मी माझ्याकडे आलेल्या मंत्र्यांना विचारला होता तेव्हा ते निरुत्तर झाले होते, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

१ जून २००४ ला मराठा आणि कुणबी एकच असल्याचा प्रस्ताव पारित झाला आहे. त्यात काही बदल आवश्यक आहेत. अटी-शर्ती काढून तो नव्याने आणला गेला पाहिजे, २०२३ चा शासन निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्र द्या असाही पर्यायही मी दिला होता. त्यानंतर त्या प्रस्तावात दुरुस्ती करण्यात आली. त्या प्रस्तावात असं लिहिलं होतं की वंशावळीच्या नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील. मात्र त्यातही सुधारणा हवी होती कारण वंशावळीच्या नोंदी आमच्याकडे नाहीत हे त्यांना सांगितलं. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला मराठा समाजाच्या वेदना ठाऊक आहे. मी जिवंत असेपर्यंत मायबाप मराठ्यांशी गद्दारी करणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.