“बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात दहा-पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचं”, असा डाव गृहमंत्र्यांनी आखला असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. बीडच्या चराटा येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी त्यांनी भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हा आरोप केला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “परळी सारख्या ठिकाणी एक लाखाची सभा होत असेल तर यातून गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यायला हवा. मराठा द्वेष करून चालणार नाही. पण त्यांच्या लक्षात येत नाही, त्याला मी काही करू शकत नाही. एक लाखाच्या सभेनंतर त्यांनी शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी. आता तर ९०० एकरवर सभा घेणार आहे. त्यात पुन्हा दिसेल.”

‘देवेंद्र फडणवीसांनी मला आत टाकावेच, मग दाखवतो’, मनोज जरांगेंचं पुन्हा एकदा आव्हान

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा

“गृहमंत्र्यांनी माझ्याबद्दल एवढा द्वेष बाळगण्याचे कारण नाही. मला तर रात्री अशी माहिती मिळाली की, मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे. गृहमंत्र्यांनी स्वप्न बघायचं जरा कमी करावं. माझ्या क्लिप व्हायरल करून, मला तडीपार करण्याचं स्वप्न त्यांनी बघू नये. आता मराठा समाज तर विरोधात गेला आहेच, पण इतर समाजही विरोधात चालला आहे. मी २४ मार्चला यावर भूमिका जाहीर करणार आहे. परळीच्या सभेला जमलेल्या गर्दीवरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी हा संकेत समजून घ्यावा. त्यांचा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाही”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

मराठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न करू नका

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “गृहमंत्री स्वतःला सर्वोच्च न्यायालयाच्याही वर समजत असतील. ही सत्ता मराठ्यांनी दिली असली तरी मी कुणावरही अन्याय करू शकतो, असे त्यांना वाटत असेल आणि या सत्तेचा वापर करून मराठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. देशभरात मोठ्या जातींना पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. पण जर सर्व मोठ्या जाती एकत्र आल्या तर यांचा राजकीय सुपडा साफ होईल.”

मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

प्रणिती शिंदे यांच्यावर हल्ला झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, मला या प्रकरणाची माहिती नाही. पण हल्ल्याचे समर्थन करता येणार नाही. हल्ल्याचे मूळ कारण माहीत झाल्याशिवाय बोलणार नाही. पण फक्त एखादा व्यक्ती मराठा समाजाचा आहे, म्हणून त्यावर आरोप करून चालणार नाही.