मुख्यमंत्र्याशी चर्चेआधीच फूट; आज बैठक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चच्रेनंतर किसान क्रांतीच्या संयोजकांनी संप मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर संपाचे केंद्र असलेल्या पुणतांबे (ता. राहाता) येथे तीव्र प्रतिक्रिया उमटली. युध्दात जिंकले पण तह करणारेच फितुर निघाल्याचे सांगत त्यांचा हजारो शेतकऱ्यांनी तीव्र निषेध केला. लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याऐवजी संयोजक दडून बसले आहेत. दरम्यान, उद्या रविवारी (दि. ४) पुन्हा बठक आयोजित करण्यात आली आहे.

पुणतांबे येथील ग्रामसभेत संपाची घोषणा करण्यात आली. त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी, रघुनाथदादा पाटीलप्रणित व कै. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनांसह ४२ संघटनांनी पाठिंबा दिला. दोन दिवस संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काल किसान क्रांतीच्या संयोजकांची बठक झाली. मुख्यमंत्र्यांबरोबर चच्रेला शिष्टमंडळ जातानाच मतभेद झाले. धनंजय धोर्डे व सुहास वहाडणे यांना नेण्यात आले नाही. तर योगेश रायते हे व्यक्तिगत कारणामुळे अनुपस्थित होते. जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल धनवट हे बठकीला गेलेच नाही. मुख्यमंत्र्यांशी होणाऱ्या चच्रेपूर्वीच किसान क्रांतीच्या संयोजकांमध्ये फूट पडली होती. तर बठकीतून समितीतील किसान सभेचे डॉ. अजित नवले हे निघून आले होते.

संयोजकांपकी जयाजी सूर्यवंशी व संदीप गिड्डे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री थेट आपल्याशी बोलायला तयार आहेत, असे सांगत चच्रेला सर्वाना राजी केले. पण रोखठोक भूमिका घेणाऱ्यांना दूर ठेवले. धनंजय जाधव हे संपाचे केंद्र असलेल्या पुणतांबे गावातील एकमेव प्रतिनिधी उपस्थित होते. संयोजकांनी संप मागे घेतल्याचे कळताच आज ग्रामपंचायतसमोर गावातील शेतकरी मोठय़ा संख्येने जमा झाले. त्यांनी संयोजकांचा निषेध करत विश्वासघातकी, फितुर, गद्दार, लाचखोर अशा शेलक्या विशेषणांनी त्यांच्यावर टीका केली. दिवसभर शिविगाळ करत अनेकांनी शिमगा साजरा केला. गोंडेगाव, चितळी, लाख, बापतरा, नपावाडी आदी शेजारच्या गावांतून व जिल्ह्णाातून दिवसभर दोन हजाराहून अधिक शेतकरी पुणतांबे येथे आले. त्यांनी संप सुरूच ठेवण्याचा आग्रह धरला. संप सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर डॉ. धनंजय धनवटे यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे बठकीला उपस्थित होते. संप फोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. आज डॉ. धनवटे, बाळासाहेब चव्हाण, अभय चव्हाण, बाळासाहेब भोरकडे यांनी निषेध सभा घेऊन आम्ही दोन महिन्याचे आश्वासन मिळविले होते. पण आता त्यांनी चार महिने घेतले. पदरातही काही पडले नाही. जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहील असा इशारा त्यांनी निषेध सभेत दिला. संपापूर्वीच तो कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हायजॅक केला होता. संप त्यांनीच फोडला अशी टीका करण्यात आली. आज विरोधी पक्षनेते विखे समर्थक आक्रमक झाले होते.

राजकीय गटबाजीची झळ.

पुणतांबे या गावात चांगदेव महाराजांची समाधी असून धार्मिकदृष्टय़ा महत्त्व आहे. साखरेच्या आगारात राहूनही तिची गोडी अंगाला लागू न देता अत्यंत कणखर, स्पष्टवक्ते व लढावू नेते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय सूर्यभान वहाडणे यांचे हे गाव आहे. तत्त्वाचे अत्यंत कडवे असलेल्या वहाडणे यांच्या या गावात आता काही कार्यकत्रे मात्र तसे राहिलेले नाही. पहिल्यांदा संप एका गटाने मागे घेतला. त्यानंतर दुसऱ्या गटाने तो दोन दिवस चालवून नंतर माघार घेतली. पण आता पुन्हा पहिल्या गटाने उचल खाल्ली. एकूणच गटबाजीची झळ संपाच्या फुटीला कारणीभूत ठरली.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi articles on maharashtra farmers go on strike part
First published on: 04-06-2017 at 03:28 IST