लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून, एका नातेवाईकासह तिघाजणांनी अधूनमधून अत्याचार करून पुन्हा मानसिक छळ चालविल्यामुळे वैतागून पीडित विवाहितेने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी तिघा नराधमांना अटक झाली असून त्यांना पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.

सूरज सुभाष नकाते (वय २९), तौसीफ चांदसाहेब मुजावर (वय २४) आणि शुभम मोहन नकाते (वय २४) अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. मृत विवाहिता आपले पती व मुलाबाळांसह पूर्वी पुण्यात राहात. अलीकडे कुटुंब मंगळवेढा तालुक्यात मूळगावी राहण्यास आले होते. याच गावात मृत विवाहितेचे माहेर असल्याने ती पूर्वी अधूनमधून येत असे.

आणखी वाचा-ST Strike : ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचारी संपावर, ३५ आगार पूर्णतः बंद; मुंबई, ठाणे, पुण्यात स्थिती काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नातेवाईक असलेल्या एका आरोपीचे मृत विवाहितेच्या घरी जाणे- येणे होते. त्याने मृत विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि संधी साधून तिच्याशी संबंध जोडले. नंतर या गुन्ह्यात इतर दोन आरोपीही सहभागी झाले. लैंगिक अत्याचारानंतर आरोपींनी मृत विवाहितेला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे वैतागून अखेर तिने तलावात उडी मारून आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.