महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या सरकारने जाणीवपूर्वक अंधत्व पत्करलं होतं आणि मुंबई महापालिका ही त्या काळात भ्रष्टाचाराचं कुरण झाली होती अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तीन कोटींचा भूखंड साडेतीनशे कोटींना गेल्याचं प्रकरण घडलं आहे का? असं विचारलं असता उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅगच्या अहवालाचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरेंवर टीका केली.

कॅगच्या अहवालाचं उदाहरण देऊन काय म्हणाले फडणवीस?

CAG च्या अहवालात हे आलं आहे तीन कोटींचा प्लॉट साडेतीनशे कोटींना देण्यात आला. त्यावरही समाधान न झाल्याने अधिकचे पैसे मिळावेत म्हणून संबंधित लोक कोर्टात गेले आहेत. त्या काळात महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं कुरण होतं ते समोर आलंय. आपल्याला एक म्हण माहित आहे ती काय तर आंधळा दळतो आणि कुत्रं पीठ खातं या म्हणीप्रमाणे त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अंधत्व पत्करुन कशाप्रकारे अनेकांना पीठ खायला दिलं जात होतं हे यातून स्पष्ट होतं. ही केवळ झाँकी आहे असे अनेक घाटाळे बाकी आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मुंबई महापालिकेतल्या मविआ काळातल्या भ्रष्टाचाराविषयी विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis: “तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री होता, पण…; देवेद्र फडणवीसांचा मविआला टोला

अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर काय म्हणाले फडणवीस?

“कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटतं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. यात वावगं काहीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना वाटू शकतं की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. आमच्या पक्षातील लोकांना भाजपाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, असं वाटू शकतं. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रीपदात कुठलाही बदल होणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- निधीवाटपावरून सभागृहात खडाजंगी, उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मला दुर्दैवाने इतिहासात…”

अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून या चर्चा सुरू झाल्या आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवून अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल, असे दावे सातत्याने केले जात आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यापासून ते काँग्रेस आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी असे दावे गेल्या काही दिवसात केले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अगदी सुरुवातीपासून (अजित पवारांच्या महायुतीतल्या प्रवेशापासून) अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होतील, असं सांगत आहेत. या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकला आहे.