कल्पना निकम या गेल्या १६ वर्षांपासून एसटी बसगाड्यांच्या दुरुस्तीचं काम करत आहेत. सध्या त्या कल्याण एसटी आगारात कारागिर ‘क’ यांत्रिक बहुव्यवसायिक या पदावर कार्यरत आहेत. या पदावर रुजू झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला कर्मचारी आहेत. टायर बदलणे असो वा इंजिन दुरुस्तीचं काम असो कल्पना अगदी योग्य पद्धतीने करतात. २००७ मध्ये राज्य परिवहन महामंडळात रुजू झाल्यानंतर सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे अवजड काम महिलांचं नाही, असे टोमणेही त्यांनी ऐकले. परंतु मेकॅनिक वडिलांकडून त्यांना मिळालेली प्रेरणा या सगळ्या अडथळ्यांवर मात करणारी ठरली. आज गाडीच्या प्रत्येक भागाविषयी त्या अगदी अचूकपणे माहिती सांगू शकतात आणि ते दुरुस्तही करु शकतात. त्यांचा हा रंजक प्रवास जाणून घेऊ या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mechanic kalpana nikam has been repairing st buses for the past 16 years kalyan depo pck
First published on: 09-11-2023 at 12:19 IST