अभिनेते नाना पाटेकर यांची माहिती

आíथकदृष्टय़ा दुर्बल शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशनतर्फे वैद्यकीय दिलासा कार्ड योजना राबवण्यात येणार असून, खासगी व्यवसाय करणारे डॉक्टर या योजनेंतर्गत मोफत सुविधा देतील, असे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितले. आत्महत्या हा जगातील सर्वात गलिच्छ प्रकार आहे. संकटे येतात आणि जातात. त्यामुळे माणसाने माणसासाठी चालवलेली माणुसकीची नाम ही चळवळ आहे. मकरंद अनासपुरे यांनीही,‘ १५ गावांमध्ये जलसिंचनाची कामे करण्यात येत असून, यासाठी तरुणांनी पुढे यावे, ‘एक गाव एक लग्नतिथी’ उपक्रम राबवावा आणि तरुणांनी हुंडा घेऊ नये,’ असे आवाहन या वेळी केले.

नाम फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती पाटेकर व अनासपुरे यांनी बुधवारी येथे पत्रकार बठकीत दिली. माणसाने माणसासाठी चालवलेली माणुसकीची चळवळ म्हणजे नाम फाउंडेशन आहे. आपला चांगुलपणावर विश्वास असल्याने सर्वाना सोबत घेऊन काम करायचे ठरवले आहे. संकटे येतात-जातात. त्यांना सामोरे गेले पाहिजे. आम्ही कोणत्याही पुरस्कारासाठी काम करीत नाही. लोकवर्गणीतून या संस्थेच्या माध्यमातून निधी उभा करीत दुष्काळी भागात जलसिंचनाची कामे करणे आणि शेतकऱ्यांना मदत करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असे पाटेकर यांनी सांगितले. नामच्या वतीने जिल्ह्य़ात १५ गावांमध्ये सुरू असलेल्या जलसिंचनाच्या कामांची माहिती देताना तरुण वर्गाने या कामात पुढे यावे, अशी अपेक्षा अनासपुरे यांनी व्यक्त केली.