लोकसत्ता वार्ताहर

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील तामसा येथे आयोजित ‘लाडक्या बहिणीचा देवा भाऊ’ कार्यक्रमात साड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दाखल झालेल्या महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. साड्यांच्या संख्येपेक्षा अधिक संख्येने आलेल्या महिलांमुळे आयोजकांचीही पंचाईत झाली.

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांडे, भाजपाचे युवा नेते भागवत देवसरकर यांनी आयोजित केलेल्या तामसा येथील कार्यक्रमाची जिल्ह्यात सर्वदूर चर्चा गोंधळाचीच झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर, जिल्हा सरचिटणीस लताताई फाळके आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

आणखी वाचा-Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आष्टी जिल्हा परिषद गटातील सर्वच गावातील ३ हजारांच्या वर महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांचा सन्मान साडी देऊन करायचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात आलेल्या महिलांची संख्या अधिक व साड्या कमी पडल्याने महिलांची एकच झुंबड उडाल्याने गोंधळ निर्माण झाला.