scorecardresearch

Premium

खातेवाटपासह खांदेपालटही, ‘या’ मंत्र्यांची खाती गेली

गेल्या अनेक दिवसांपासून खातेवाटपाची जोरदार चर्चा सुरू होती. खातेवाटप जाहीर झाले असून काही मंत्र्यांचीही खाती काढून घेण्यात आली आहे.

Maharashtra cabinet
कोणाची खाती घेतली काढून? (फोटो – प्रातिनिधिक छायाचित्र)

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी ८ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, या शपथविधीला १२ दिवस उलटल्यानंतरही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचं घोंडगं भिजत पडलं होतं. अखेर आज अधिकृत खातेवाटप करण्यात आले आहे. परंतु, हे खातेवाटप करताना अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. अनेक मंत्र्यांच्या हातातील खाती काढून घेऊन नव्या मंत्र्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

वादग्रस्त वक्तव्ये अब्दुल सत्तारांना भोवली?

शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खातं देण्यात आलं होतं. याच काळात त्यांच्याकडून अनेक वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली. सुप्रिया सुळेंबाबत शिवीगाळ करण्यापासून ते टीईटी घोटाळाप्रकरणी अब्दुल सत्तार सातत्याने चर्चेत होते. याचाच परिणाम म्हणून अब्दुल सत्तारांकडून कृषी खातं काढून घेण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. हे कृषी खातं आता धनजंय मुंडे यांना देण्यात आलं आहे. तर, अब्दुल सत्तार यांच्यावर आता अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Farmer Protest
‘चलो दिल्ली’ २९ फेब्रुवारीपर्यंत स्थगित, पण सरकारविरोधात ‘या’ कार्यक्रमांचं आयोजन; शेतकरी संघटनांची पुढची रणनीती काय?
onion export, onion rate,
कांदा निर्यातीला केंद्राची परवानगी, मुख्यमंत्र्यांची माहिती; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
Tejswi Yadav Home
Bihar Floor Test : आमदार बेपत्ता झाल्याची तक्रार, पोलिसांची मध्यरात्री तेजस्वी यादवांच्या घरी धाड, बिहारमध्ये नक्की काय चाललंय?
study group report recommended many benefits for maharashtra loom owners zws 70
राज्यातील यंत्रमागधारकांच्या प्रलंबित मागण्यांना अभ्यास समितीनकडून न्याय; अनेक चांगल्या शिफारशी 

हेही वाचा >> महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ खातं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती

संजय राठोडांचीही उचलबांगडी

खातेवाटप जाहीर करताना खांदेपालटही करण्यात आले आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तारांसह संजय राठोड यांचंही अन्न आणि औषध प्रशासन खातं काढून घेण्यात आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन खातं आता छगन भुजबळ यांना देण्यात आलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही हे खातं छगन भुजबळ यांच्याकडेच होते. तर, संजय राठोड यांना मृदा आणि जलसंधारण खातं देण्यात आलं आहे.

अतुल सावेंकडूनही जबाबदारी काढली

अतुल सावे यांच्याकडे सहकार खातं होतं. हे खातंही त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आहे. अतुल सावे यांना गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, सहकार खातं दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:

छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा संरक्षण हे खातं देण्यात आलं आहे. दिलीप वळसे पाटील हे आता सहकार मंत्री असणार आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल, पशुसंववर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास हे खातं दिलं गेलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आता वनं, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय हे खातं देण्यात आलं आहे. हसन मुश्रीफ हे आता वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्रीपद देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील हे उच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रीपद देण्यात आलं आहे. गिरीश महाजन यांना ग्राम विकास आणि पंचायत राज तसंच पर्यटन खातं देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता खातं होतं तेच कायम ठेवण्यात आलं आहे. दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री असतील. संजय राठोड यांना मृता आणि जलसंधारण खातं देण्यात आलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ministry of these ministers were taken away sgk

First published on: 14-07-2023 at 17:43 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×