भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांचे सुमारे १ लाख २० हजार रुपये किंमतीचे दोन महागडे मोबाईल रेल्वे प्रवासादरम्यान चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार येथे घडला. आज (दि.४) मुंबई-अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेसमध्ये ठाणे-कसारा दरम्यान वातानुकुलित डब्यात ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार सुरेश भोळे हे पठाणकोट एक्स्प्रेसच्या ए-१ वातानुकुलित डब्यातून मुंबईहून जळगावकडे असा प्रवास करीत होते. रेल्वे ठाणे-कसारा दरम्यान आल्यानंतर आमदार भोळे झोपले असताना त्यांच्या जवळील दोन मोबाईल चोलट्यांनी लांबवले.

या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla suresh bhole expensive mobile phones theft from railway
First published on: 04-07-2017 at 18:48 IST