सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन आमदार सुरेश खाडे यांनी केले.मिरज विधानसभा कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी संपन्न झाला. या मेळाव्यात आ. खाडे बोलत होते. यावेळी नीता केळकर, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. खाडे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूत असेल तर कोणत्याही निवडणुका कधीही झाल्या तरी पक्षास अडचण येणार नाही, असे सांगत येणाऱ्या निवडणुका ताकदीने लढण्याचे आवाहन केले.
यावेळी मिरज मतदारसंघातील मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे, मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्षा अनिता हारगे, मिरज ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष अभिजित गौराजे, मिरज ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष मयुर नाईकवाडे यांच्या या चारही मंडल पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी उपस्थितीत निताताई केळकर, सुमनताई खाडे, पांडुरंग कोरे, सुशांत खाडे, भारतीताई दिगडे, सुरेशबापू आवटी, संगीता खोत, सरिता कोरबू, ज्योती कांबळे, योगेंद्र थोरात, दिगंबर जाधव ग्रामीण भागातील भाजपा सरपंच ग्रामपंचायत सदस्य, महानगरपालिका माजी नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून शनिवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. गेल्या वेळी महापालिका निवडनुकीत निवडून आलेले आणि पराभूत झालेल्या कार्यकर्त्यांशी आणि मंडल अध्यक्षांशी संवाद साधला. यावेळच्या निवडणुकीत महापालिकेच्या ६० जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले.