scorecardresearch

Premium

“हिंदुत्वाच्या श्रीखंडात देशद्रोह्यांची ‘मिर्ची’ टाकणं महायुतीच्या ‘प्रफुल्लित’ कार्यकर्त्यांना ‘पटेल’ ? आणि… “, मनसेचा सरकारला टोला

नवाब मलिक यांच्यावरुनही मनसेने सवाल केला होता, आता तसाच टोला प्रफुल्ल पटेलांवरुनही सरकारला लगावला आहे.

What MNS Said?
मनसेची सरकारवर प्रफुल्ल पटेलांवरुन टीका

नवाब मलिक प्रकरणावरुन महायुती सरकारची कोंडी झाली आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप असताना ते सत्ताधारी बाकांवर कसे काय? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. तसंच नवाब मलिक यांचं उदाहरण देताना प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्चीशी व्यवहार झाल्याचा आरोप भाजपानेच केला होता. त्यांच्याविषयी कुणी काहीच का बोलत नाही? असाही प्रश्न विरोधकांनी विचारला आहे. यामध्ये आता मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेने एक्स या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट लिहित सरकारला खोचक प्रश्न विचारत टोला लगावला आहे.

काय आहे मनसेचा टोला?

हिंदुत्वाच्या श्रीखंडात देशद्रोह्यांची ‘मिर्ची’ टाकणं महायुतीच्या ‘प्रफुल्लित’ कार्यकर्त्यांना ‘पटेल’ ? आणि हो, ‘नवाब’चाही ‘जवाब’ ‘पटेल’ असाच द्या. अशी पोस्ट मनसेने केली आहे. याला सत्ताधाऱ्यांकडून आणि खासकरुन भाजपाकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

several maha vikas aghadi leaders accused of corruption today they are part of bjp government
 ‘ते’ तेव्हा तिथे..आता इथे!
murder case of MNS Jameel Sheikh
ठाणे : मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत
tasgaon rr patil latest news in marathi, rr patil marathi news, rr patil loksabha election marathi news
तासगावमध्ये आर.आर.आबांच्या वारसदारांपुढे आव्हान
Rupali Chakankar sanjay gaikwad
मराठा आरक्षणावरून शिंदे-अजित पवार गटात जुंपली, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर चाकणकरांचं चोख प्रत्युत्तर!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे गुरुवारी (७ डिसेंबर) आणि शुक्रवारी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले. दोन्ही दिवस मलिक हे विधीमंडळाच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, असं स्पष्ट केलं. दरम्यान, फडणवीसांच्या पत्राला ढोंग म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

मलिकांबरोबरच प्रफुल्ल पटेल यांच्या इक्बाल मिर्चीबरोबरच्या संबंधांबाबतचा मुद्दा काँग्रेस व अन्य विरोधकांनी उपस्थित केल्याने फडणवीस व भाजपची कोंडी झाली आहे. पटेल यांचे दाऊदचा सहकारी मिर्चीशी संबंध असून वरळीतील सीजे हाऊस या मालमत्तेच्या विकासावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २१ जुलै २०२२ रोजी कारवाई करून अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमतेच्या व्यवहाराच्या बदल्यात पटेल यांनी मिर्चीच्या निकटवर्तीय व नातेवाईकांना २२ कोटी रुपये, सात सदनिका दिल्याचा आरोप आहे. ईडीने पटेल यांच्या सदनिका, एक चित्रपटगृह, हॉटेल, पाचगणी येथे एक हॉटेल, दोन बंगले आणि साडेतीन एकर जमीन एवढ्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

पटेल यांचे मिर्चीशी असलेल्या संबंधांवरून फडणवीस आणि अन्य भाजप नेत्यांनी ईडीच्या कारवाईनंतर आणि आधीही अनेकदा आरोप केले आहेत. मलिक यांच्यावर देशद्रोही दाऊदशी संबंध असल्याचे आरोप फडणवीस यांनी केले, तेव्हाही पटेल व मिर्ची आर्थिक संबंधांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पटेल यांच्याविरोधात मोर्चा काढून निदर्शनेही केली होती. हे सगळे मुद्दे आता विरोधक उचलून धरत आहेत. तर आता मनसेनेही खोचक पोस्ट लिहित सरकारला सवाल केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns ask question to eknath shinde devendra fadnavis and ajit pawar government over praful patel scj

First published on: 09-12-2023 at 15:08 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×