महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता ठाण्यातील गडकरी रंगायथन इथे सभा होणार आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात साजरा केला जाणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, तत्पूर्वी मनसेकडून नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माण सज्ज! अशा आशयाचे पोस्टर ट्वीट करण्यात आलं असून टीझरदेखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हेही वाचा – “आता स्त्रियांनी…”, राज ठाकरेंचं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जागतिक महिला दिनी समस्त महिला वर्गाला आवाहन!

ashok chavan raj thackeray
राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाबाबत अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य

मनसे कार्यकर्त्यांकडून वातावरण निर्मितीचा प्रयत्न

आज ठाण्यात होणाऱ्या सभेपूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून वातावरण निर्मिती केली आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शक्तीप्रदर्शन करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. वर्धापनदिन कार्यक्रमाच्यानिमित्ताने मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांकडून ‘संघर्षाची तयारी… पुन्हा एकदा भरारी’ अशा पोस्ट समाजमाध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून प्रसारित केल्या जात होत्या. त्यापाठोपाठ आता सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावण्यात आले आहे.

हेही वाचा – Video: “…तिकडचो आमदार हिकडं कर रे महाराजा” कोकणी गर्ल अंकिता वालावलकरचं राज ठाकरेंच्या मनसेसाठी गाऱ्हाणं

मनसेकडून टीझर रिलीझ

दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेकडून एक टीझर ट्वीट करण्यात आला आहे. नव्या दमाने, नव्या आयुधांसह, नवनिर्माणास सज्ज! असं कॅप्शन या देत हा टीझर रिलीझ करण्यात आला.

हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार? कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “त्यांना…”

राज ठाकरेंच्या भूमिककडे सर्वांच लक्ष

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज ठाकरे यांनी ठाण्यात एक सभा घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील मशीदींवरील भोंग्यांसदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मात्र, आता राज्यात सत्ताबदल झाले असून शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आहेत. शिवाय राज्यातील राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका, अर्थसंकल्पीय अधिवेशन, राजकीय नेत्यांच्या विधानावरून सुरू असलेला वाद, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि नुकताच संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.