महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा मराठवाडा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. पक्षाच्या राज्याव्यापी अधिवेशनानंतर राज ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा होता, पण तो आता रद्द करुन पुढे ढकलण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे यांचा हा पहिला मराठवाडा दौरा महत्वाचा मानला जात होता. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. या दौऱ्यात लातूर येथे आयोजित कृषी नवनिर्माण २०२० चं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मराठवाड्यात पक्षाच्या विस्तारासाठी राज ठाकरे यांच्यासाठी हा दौरा महत्त्वाचा होता.

हर्षवर्धन जाधव हे मनसेचे मराठवाड्यातील एकमेव आमदार होते. जाधव यांनी मनसेला रामराम केल्यानंतर मराठवाड्यात पोकळी निर्माण झालीये. त्यामुळे मनसेला मराठवाड्यात आपला जनाधार वाढवण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, यापूर्वी आपल्या अधिवेशनात प्रखर हिंदुत्वाची वाट धरल्यानंतर राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj thackeray cancels his proposed marathwada tour sas
First published on: 28-01-2020 at 13:16 IST