वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक आक्रमक झाली असून आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मात्र अहमदनगरमध्ये या आंदोलनाचा हिंसक वळण मिळालं. येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोपरगावमधील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोडफोड करु नये असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानंतरही अहमदनगरमध्ये मनसे स्टाइल आंदोलन झाल्याचे पहायला मिळतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुपारी बाराच्या सुमारास कोपरगावमधील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये मनसेचे कार्यकर्ते पोहचले आणि त्यांनी तोडफोड केली. तीन महिन्यांपूर्वी आम्ही वेळोवेळी निवेदनं देऊन आमची वीज बिलं माफ करावीत असं म्हटलं होतं. मात्र त्यावर वीज वितरक कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज वीज बिलांविरोधात राज्यभरात पुकारण्यात आलेल्या महामोर्चा आंदोलनादरम्यान या अभियंत्याच्या कार्यलयाची तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खूर्च्यांबरोबरच शोकेसच्या काचा आणि खिडक्यांचीही तोडफोड केली.

कोपरगावमधील तोडफोड प्रकरणात पोलिसांनी मनसे उपजिल्हा प्रमुखांसहीत चार जणांना ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो अशा घोषणा देत या कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये तोडफोड केली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं आहे.

आणखी वाचा- हा तर ठाकरे सरकारचा जिझिया कर; वीजबिलांवरून राज ठाकरे कडाडले

राज म्हणालेले तोडफोड नको…

आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. मुंबईत वांद्रे येथे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आहे. आंबेडकर गार्डनपर्यंत मोर्चा काढल्यानंतर मनसे नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी, “कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करायचं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा राज ठाकरेंचा सक्त आदेश आहे. कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही,” असं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns supporters vandalize engineers office during protest scsg
First published on: 26-11-2020 at 14:37 IST