रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे येथील गणेश मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत समुद्राच्या लाटांचे पाणी आल्याने श्रीच्या दर्शनाला समुद्र आल्यासारखे चित्र पहावयास मिळत आहे. समुद्राच्या लाटांचे पाणी गणपती मंदिराच्या पायऱ्याला टेकल्याने याचा आनंद गणेश भक्त पर्यटकांनी मनसोक्त लुटला.
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. अशा गणपतीपुळे या ठिकाणी दरवर्षी अनेक गणेश भक्त गणेशाच्या दर्शनाला गणपतीपुळे येथे येत असतात. दरवर्षी गणेश भक्त व पर्यटक या ठिकाणी येऊन समुद्राबरोबर गणपतीच्या दर्शनाचा आनंद लुटत असतात. सुट्टीच्या कालावधी या ठिकाणी मोठी गर्दी असते. मात्र पावसाळ्यामध्ये देखील अनेक पर्यटन गणपतीपुळे येथील गणेश मंदिरासह पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी वारंवार येथे येत असल्याचे पहावयास मिळते.
अशा प्रसिद्ध गणपतीपुळेच्या ठिकाणी समुद्राच्या लाटांनी रौद्ररूप धारण केलेले दिसून येत आहे. या लाटांना उधाण आल्याने उंच उंच लाटा देवळापर्यंत येत असल्याचे दिसून येत आहे. समुद्राच्या लाटा गणेश मंदिरापर्यंत येऊ लागल्याने जणू काही लाटा गणेशाच्या दर्शनाला येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या सगळ्याचा आनंद ठिकठिकाणाहून आलेल्या पर्यटकांनी लूटला.
गणपतीपुळे येथील घाटांचे रुद्ररूप पाहून या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी पर्यटकांना या लाटांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच समुद्राला आलेल्या उद्यानामुळे येथील आर्थिक उलाढाल काही प्रमाणात मंदावले आहे. समुद्रालगत असलेल्या दुकानदारांनी आपले दुकाने बंद ठेवणे पसंत केले आहे.
गतवर्षी देखील पावसाळ्यामध्ये समुद्राने रौद्र रूप धारण केल्याने गणपतीपुळे येथील समुद्र लागत असलेल्या दुकानदारांना उधळलेल्या लाटांचा मोठा फटका बसला होता. यामध्ये दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी सावधगिरी बाळगली जात आहे.