सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्याच्या बहुतांश भागात मागील पाच-सहा दिवसांपासून कमी-जास्त प्रमाणात पावसाची हजेरी लागत आहे. बुधवारी सायंकाळीही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे यंदाच्या मे महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यापासूनच पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे.
सोलापुरात दर उन्हाळ्यात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत तापमान प्रचंड वाढून उष्म्यामुळे अंगाची लाही लाही होते. जून महिना सरत असताही उन्हाळ्याची तीव्रता जाणवत राहते. परंतु यंदा मागील दहा वर्षांत प्रथमच मे महिन्यात वळवाच्या पावसाची नऊ दिवस हजेरी लागली आहे. यात सलग सहा दिवस पाऊस पडत आहे.
१४ मे रोजी जिल्ह्यात सरासरी ३५.७ मिलिमीटर इतका दमदार वळवाचा पाऊस झाला होता. त्यामुळे काही भागांत शेतीचे नुकसान झाले होते. १६ मे रोजी १२ मिमी पावसाची नोंद झाली होती. बुधवारी सकाळी संपलेल्या १२ तासांत १६.६ मिमी पावसाची हजेरी लागली. यात सर्वाधिक ३८.८ मिमी पाऊस एकट्या माढा तालुक्यात झाला. त्या खालोखाल माळशिरसमध्ये १८.२, तर अक्कलकोटमध्ये १६.२ मिमी पावसाची नोंद झाली. उत्तर सोलापूर-७.३, दक्षिण सोलापूर-८, मोहोळ-७.५, करमाळा-२.८, मंगळवेढा-५.२ याप्रमाणे पावसाची हजेरी लागली. बार्शी, पंढरपूर, सांगोला आदी भागात पावसाची नोंद झाली नाही.
चालू मे महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ८६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १०६.२ मिमी पाऊस मंगळवेढा तालुक्यात पडला आहे. तर, त्या खालोखाल सांगोला तालुक्यात १०३.२ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात १००.४ मिमी पाऊस झाला आहे. माढा-९२.२, दक्षिण सोलापूर-८९.६, माळशिरस-८६.८, अक्कलकोट-८४, मोहोळ-७८, करमा