धुळे येथील पोलीस निरीक्षकाकडे घरफोडीची घटना ताजी असतानाच शहर वाहतूक पोलिसाची मोटरसायकल चोरीस गेली आहे. मोटरसायकल थेट वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या आवरातूनच चोरून चोरांनी पोलिसांनाच पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. धुळे शहर वाहतूक शाखा व शहर पोलीस ठाण्याचे एकच आवार आहे. यामुळे रात्रंदिवस याठिकाणी पोलिसांचा वावर असतो. तरी देखील पोलीस अधिकार्‍याच्या घरात आणि आता पोलीस ठाण्याच्या आवारात चोरी करण्यापर्यंत चोरांची मजल गेल्याने पोलिसांवर स्वरक्षणाची वेळ आल्याचे येथील स्थानिक नागरिक बोलून दाखवत आहेत.  पोलीस हवालदार राजेंद्र विश्‍वास हिरे (रा.धुळे) हे दि. १७ मार्च रोजी सकाळी अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांच्या वाहनांच्या पायलटींग ड्युटीवर असतांना त्यांनी त्यांची मोटरसायकल वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयातून चोरीला गेली. मोटरसायकल चोरीला गेल्याचे लक्षात येताच हिरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorcycle theft from police station dhule
First published on: 30-03-2017 at 20:05 IST