वाई : प्रभू श्रीराम आणि कोणत्याही युगपुरुषाबद्दल कोणीही विधान करू नयेत. कारण नसताना राजकरण करत मतभेद निर्माण केले जात आहेत त्यात विकृती पण आहे. युग पुरुषांबद्दल चुकीची विधाने करणाऱ्यांवर कडाक कारवाई करण्याची मागणी करत खा. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना नाव न घेता फटकारले आहे.

सातारा शहरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या ठिकाणी आज प्रभू श्रीरामाच्या कलशाचे भवानी मातेच्या मंदिरात विधिवत पूजन करण्यात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बाबूजी नाटेकर सारंग कोल्हापुरे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सुनील काटकर पंकज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

congress rebel candidate vishal patil
शिस्तभंगाची कारवाई करणाऱ्यांनी काँग्रेससाठी योगदान किती तपासावे – विशाल पाटील
jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?

आणखी वाचा-“जितेंद्र आव्हाडांनी देशाची माफी मागितली पाहिजे, त्यांना आग्र्याला जायचं असेल तर…”; नवनीत राणांची बोचरी टीका

संत किंवा युगपुरुष हे कधी मांसाहारी होते का असा सवाल उपस्थित करत असं बोलणे ही मोठी शोकांतिका आणि विकृती आहे असं सांगून खा. उदयनराजे म्हणाले, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी विकृतीतून युग पुरुषांबद्दल चुकीची विधाने करणाऱ्यांवर कडाक कारवाई करण्याची कायदा करण्याची मागणी मी केली आहे. धर्मगुरू ,युगपुरुष, संत हे मांसाहारी होते का असे बोलणे चुकीचे आहे. या सर्वांनी समाजासाठी फार मोठा त्याग केला आहे. कोणत्याही युगपुरुषाबद्दल कोणीही आक्षेपार्ह विधाने करू नयेत. कारण नसताना धर्मगुरू युगपुरुष संत यांच्याबाबत राजकरण करू नये. सातारा लोकसभेसाठी इच्छुक असल्याबाबत विचारले असता खासदार उदयनराजे यांनी बगल देत ज्या त्यावेळेला बघू असे उत्तर दिले.

हिंदू हा धर्म नसून जगण्याचा मार्ग आहे

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व धर्म समभाव ही संकलपना रुजवली, आचरणात आणली. त्यांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष,भेदभाव केला नाही.आज मात्र जातीजातीत भेदभाव निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे जर खऱ्या अर्थाने कोणी आचरणात आणले असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले. -उदयनराजें भोसले, खासदार