scorecardresearch

Premium

उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांच्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीवर ‘मशाल’, ठाकरे गटातील खासदाराचं सूचक विधान; म्हणाले…

किरण सामंत यांनीही व्हॉट्सअ‍ॅप डीपीवर ‘मशाल’ चिन्ह ठेवण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

uddhav thackeray kiran samant (1)
ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील डीपीमुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत असलेल्या किरण सामंत यांनी डीपीवर ठाकरे गटाचं ‘मशाल’ चिन्ह ठेवलं. तसेच, कॅप्शनला ‘जो भी होगा देखा जागेया’ असं लिहिण्यात आलं होतं. यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. तर, आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.

विनायक राऊत म्हणाले, “किरण सामंत यांच्यासारखे शिंदे गटातील अनेकजण मशाल चिन्ह हाती घेऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या मानसिकतेत आहेत. येत्या काही महिन्यात शिंदे गटाला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रात मोठं भगदाड पडणार आहे. भाजपा शिंदे गटाचं लवकरच विसर्जन करेल, हे माहिती असल्यानं अनेकांच्या हातात मशाल येईल.”

Rahul Narvekar and Ulhas Bapat
“क्षुल्लक निर्णय घ्यायला…”, १६ आमदार अपात्रतेप्रकरणी घटनातज्ज्ञ उल्हास बापटांची थेट राहुल नार्वेकरांवर टीका
Uddhav thackeray on nanded case
नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “खेकड्यांच्या हातात…”
prafull patel supriya sule
“प्रफुल्ल पटेल ‘घड्याळ’ चिन्ह मिळण्याबाबत तारीख सांगतात, पण…”, सुप्रिया सुळेंचा सवाल
Chandrasekhar Bawankule apologized to Ajit Pawar
चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची क्षमा मागितली, असं का केलं त्यांनी?

हेही वाचा : बारामती अ‍ॅग्रोबाबत रोहित पवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; विरोधकांना इशारा देत म्हणाले…

“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे पाहून डीपी मागे घेतला”

व्हॉट्सअ‍ॅप डीपी प्रकरणावर किरण सामंत यांनी म्हटलं, “मी डीपी ठेवला होता. याला काही कारणं होती. त्यावर योग्यवेळी बोलेन. फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे पाहून डीपी मागे घेतला.”

हेही वाचा : दसरा मेळाव्यासाठी ‘शिवाजी पार्क’चं मैदान कोण मारणार? ठाकरे अन् शिंदे गटाचा महापालिकेकडं अर्ज

“उदय सामंत यांच्या राजकीय करिअरमुळे कॅप्शन मागे घेतलं”

‘जो भी होगा देखा जाये गा’ असं कॅप्शन लिहिण्याबाबत किरण सामंत म्हणाले, “शंभर टक्के सर्व गोष्टीला आपली तयारी होती. फक्त उदय सामंत यांच्या राजकीय करिअरमुळे कॅप्शन मागे घेतलं. माझ्यामुळे उदय सामंत यांचं राजकीय करिअर खराब होऊ नये.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mp vinayak raut on uday samant brother kiran samant whats app dp thackeray mashal ssa

First published on: 29-09-2023 at 23:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×