कोल्हापूर : भरदुपारी रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून कागल येथे एका तरूणाचा खून करण्यात आला. आकाश विनायक सोनुले उर्फ मॅनर्स (वय २८, रा. मातंग वसाहत, कागल) असे मयत तरुणाचे नाव आहे. खून केल्यानंतर हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाले. तो गटार बांधकाम ठेकेदार होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा फुले वसाहतीजवळ लक्ष्मी मंदीरासमोर दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली. लॉकडाउनमुळे कागल शहरातील रस्ते निमर्नुष्य आहेत. शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. अशा परिस्थितीत येथील महात्मा फुले वसाहतीजवळील लक्ष्मी मंदीर समोरून आपल्या घराकडे आकाश जात होता. यावेळी तेथे दबा धरून राहिलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्याला थांबवुन डोळ्यत मिरचीपूड फेकली. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप डोक्यात, मानेवर व पोटात १६ वार करण्यात आले. या हल्ल्यात आकाश किंचाळत जागेवर कोसळला. तो निचपित पडल्यावर दोन हल्लेखोर मोटरसायकलवरून सांगाव नाक्याच्या दिशेने पसार झाले. जमलेल्या तरुणांनी आकाशला उपचारासाठी नेले, मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाला.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, करवीरचे उपविभागीय अधिकारी डॉ.प्रशांत अमृतकर, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच फ्लॉरेन्सिक लॅबच्या तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन मिळालेल्या शस्त्राची पाहणी केली. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of a youth on the streets in the afternoon in kagal during the lockdown scj
First published on: 24-07-2020 at 20:51 IST