राज्यात सत्तांतरानंतर मुख्मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यकारभार हाकायला सुरुवात केली आहे. मात्र शिवसेनेतील बंडखोरी आणि एकनाथ शिंदे यांनी या बंडखोरीचे केलेले नेतृत्व हा विषय अजूनही मागे पडलेला नाही. या बंडाबाबत बोलताना हिंदुत्वासाठी हा निर्णय घेतला, असे शिंदे सांगतात. आजदेखील त्यांनी सत्तासंघर्षावर विस्तृत भाष्य केले. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शिवसैनिकांना काय मिळालं, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच आपल्याच माणसांनी आमच्यावर वार केले. ते आम्ही झेलले, असे म्हणत शिंदे यांनी आपली खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली. पंढरपूर दौऱ्यावर असताना ते एका मेळाव्यात बोलत होते.

हेही वाचा >>> “अजून खूप काही सांगायचे बाकी, वेळ आणली तर…” विधिमंडळातील भाषणाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिला इशारा

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
rajan vichare emotional appeal
अन्याय सहन केलात… आता लढायला सज्ज व्हा; राजन विचारे यांचं भावनिक आवाहन 

“आज पंढरपुरात हजारो, लाखो लोक दाखल झाले होते. प्रत्येकजण हसतमुखाने मला शुभेच्छा देत होता. आशीर्वाद देत होता. पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही गाडीच्या बाहेर येऊ नका. पण मला राहवलं नाही. मी पोलिसांना सांगितलं की, यांच्याकडून मला धोका नाही. ज्यांच्याकडून मला धोका होता, तो टळलेला आहे. आता मला जनतेचं कवच आहे. हे माझे पाठीराखे आहेत. वारकरी संप्रदाय आहे, तो अन्यायाविरुद्ध वार करतो. इथे आपल्याच माणासांनी आमच्यावर अनेक वार केले. ते आम्ही झेलले. मला इतिहासात जायचे नाही. पण पंढरपूरमध्ये मला जे प्रेम मिळालं, ते मी कधीही विसरणार नाही,” असे एकनाथ शिंदे म्हणाले. हे वक्तव्य करताना शिंदे यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, त्यामुळे शिंदे यांचा रोख नेमका कोणाकडे होता, याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत.

हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदे यांनी नेमकं सांगितलं, म्हणाले…

तसेच, “बाळासाहेबांचे हिंदुत्व म्हणजे इतर समाजाचा द्वेश असे आहे का? तर नाही. इतर समाज, धर्माचा आदर राखण्याचं आपलं काम आहे; हे बाळासाहेबांनी, दिघेंनी शिकवलं. अशातून आपण पुढे जातोय. कारणमीमांसा शोधण्याऐवजी खालच्या पातळीवर बोललं गेलं. काय-काय उपमा देण्यात आली. कामाख्या देवीकडे किती लोक पाठवले? असे विचारण्यात आले. पण कामाख्या देवीने शेवटी काय केले, हे आपल्याला माहिती आहे. आम्ही टीकेवर काहीही बोललो नाही. आम्ही आमच्या कामातून त्यांना उत्तर देणार आहोत. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करुन त्यांना उत्तर देणार आहोत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> मुंबई : शाहू महाराज की स्वातंत्र्यवीर सावरकर? छात्रभारतीच्या मागणीनंतर विद्यापीठाच्या वसतीगृह नामकरणावरुन वाद पेटण्याची शक्यता

तसेच शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीवरही त्यांनी भाष्य केले. “ही लढाई सोपी नव्हती. खूप प्रयत्न केले. ज्या आमदारांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांना मी सांगितलं, की कधीही तुमचं नुकसान होऊ देणार नाही. जेव्हा तुमचं नुकसान होतंय असे वाटेल, तेव्हा सगळी जबाबदारी मी घेईन. अशा प्रसंगात वेळ पडली तर टोकाचं पाऊल उचलेन, असे माझे शब्द होते. लोकांनी मला काहीही विचारलं नाही. कुठे चाललोय, कशासाठी चाललोय हे विचारले नाही. लोकांनी माझ्यावर भरभरून विश्वास टाकला. जी गाडी मिळेल त्या गडीने रवाना झाले,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.