आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांना वेग आला आहे. विविध पक्षाच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारक मतदारसंघात जाऊन प्रचार सभा घेत आहेत. अनेक मान्यवरांच्या गाठीभेटी घेत आहेत. जास्तीत जास्त मतदान होऊन सर्वाधिक मतं पदारत पाडण्याकरता स्टार प्रचारांकी प्रयत्नांची पराकष्टा केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीतील नेते अजित पवार यांनीही विविध मतदारसंघात जाऊन तेथील उमेदवारांसाठी प्रचार केला. आज सकाळीच त्यांनी इंदापूर येतील डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्याला भेट दिली. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावत भाषण केलं. तसंच, स्वतःच्या रेकॉर्डबाबतही उपहासात्मक भाष्य केलं.

अजित पवार म्हणाले, माझ्या डॉक्टर आणि वकिल मित्रांनो एक त्रयस्थ भारतीय नागरीक म्हणून विचार करा, एका बाजूला नरेंद्र मोदींचा चेहरा पंतप्रधान म्हणून आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींचा चेहरा धरू. काय परिस्थिती आहे? आतापर्यंत काय काम केलं? गेले ५०० वर्षे रामाचं मंदिर झालं नव्हतं. पण राम मंदिराचं अनेकांचं स्वप्न होतं, ते मोदींनी पूर्ण केलं.

सहावेळा उपमुख्यमंत्री व्हायला निवडूनही यावं लागतं

“मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी राज्याचा अर्थमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे. आम्ही महायुतीत सरकार चालवत आहोत. मी राज्यासाठी अनेक गोष्टी केल्या. मी आताही सरकारमध्ये गेलो ते कामासाठीच गेलो. मी सत्तेला हापापलेला माणूस नाही. मी अनेक वर्षे अनेक पदांवर होतो. मी पाच ते सहा वेळेला उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आहे. माझा रेकॉर्ड कोणी तोडेल असं मला वाटत नाही. सहा वेळा उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळेला निवडूनही यायला पाहिजे. अलीकडे आम्ही काम नाही केलं की लोक पार्सल बाजूला करतात. ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे”, असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमचं नाव घेतलं की चांगले उपचार द्या

उपस्थित डॉक्टरांबरोबरही त्यांनी मिश्किल संवाद साधला. अजित पवार म्हणाले, “तुम्ही सहज खूप काही काम करू शकता. माणूस खरं कोणाशी बोलतो तर तो डॉक्टरशी बोलतो. कारण काय वेदना होतात हे सांगितल्याशिवाय त्यावर उपचार होत नाहीत. त्याला उपचार करत असताना थोडंसं काय कसं चाललंय, मनात काय आहे, असं विचारा. त्यांनी आमचं नाव घेतलं तर खूप चांगली वागणूक द्या, दुसरं नाव घेतलं तर असं इंजेक्शन टोचा की…”, असं म्हणाले. पण पुढे ते सॉरी बोलून मला असं काही म्हणायचं नाही, असंही म्हणाले.