करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउ घोषित करण्यात आले आहे. तसंच देशात आणि राज्यात करोनाग्रस्तांचा आकडाही वाढत आहे. या परिस्थिती खासगी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांनी सेवा देणं बंद केल्याच्या काही तक्रारी समोर आल्या होत्या. याव्यतिरिक्त आरोग्यमंत्र्यांनीदेखील अशा परिस्थितीत खासगी डॉक्टरांनी असंवेदनशीलता दाखवू नये असं म्हटलं होतं, त्यानंतर आता नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. लॉकडाउन दरम्यान कोणतीही खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवू नये, असे आदेश त्यांनी दिले आहेत, असं केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात मुंढे यांनी रविवारी एक आदेश काढला आहे. लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी खासगी दवाखाने, लॅब, औषधांची दुकानं बंद असल्याचं निदर्शनास आलं आहे. लॉकडाउन लोकांनी बाहेर पडून करोनाचा प्रसार करू नये यासाठी लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे या सेवा बंद ठेवण्याचं कारण नाही, असं आदेशात म्हटलं आहे. या सेवा बंद ठेवल्यानं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून याबाबत काही तक्रारी मिळाल्या आहे. त्यामुळे या सेवा सुरू ठेवाव्यात असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

आणखी वाचा- ‘घराबाहेर पडू नका’ हे नाशिककर ऐकेनात; विश्वास नांगरे-पाटील यांनी शोधला जालीम उपाय

दरम्यान या सेवा सुरू न करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असं आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, सर्व संघटनांना त्यांनी हा आदेश पाठवला आहे. सध्या देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. राज्यात यानं २०० चा आकडा पार केला आहे. यापैकी १४ जण हे नागपुरातील असल्याचं समोर आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur municipal corporation commissioner tukaram mundhe warns private labs doctors resume their services lockdown coronavirus jud
First published on: 30-03-2020 at 08:21 IST