मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यात काही दिवसांनी सत्तांतर झाले. या सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय समिकरणं बदलली आहेत. सध्या शिंदे गट-भाजपा एकत्र आहेत. तर विरोधी बाकावर असलेले ठाकरे गट -राष्ट्रवादी-काँग्रेस हे पक्ष अजूनही महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. असे असले तरी आगमी महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र राहणार का याबाबत संभ्रम आहे. असे असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही. ज्यांना आमचा विचार मान्य आहे, ते आमचे मित्र आहेत. शिवसेना आणि भाजपा मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत एकत्र होते. याच कारणामुळे आम्हाला शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा >>> भिडे गुरुजींशी तुमचे वैयक्तिक संबंध आहेत का? पत्रकारांनी विचारताच जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले “मी त्यांना…”

“भाजपा आणि शिवसेनेचे झालेले भांडण आणि पहाटे स्थापन झालेलं सरकार या सर्व घटनाक्रमाची आपल्याला कल्पना आहे. म्हणूनच शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही. ते आमच्या विचारासोबत असतील तर ते आमचे मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी सगळे सोबत होते. त्यामुळे अजूनही आम्हाला संभ्रम आहे,” असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा >>> रवी राणांसोबतच्या वादानंतर आता पुढे काय? आगामी निवडणुकीत कोणाशी युती? बच्चू कडू म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली होती. मात्र नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत केलेल्या वरील विधानानंतर आगामी काळात उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.