Narayan Rane लोकसभा निवडणुकीतनंतर देशात मोदींच्या नेतृत्वात नवं सरकार आलं. या सरकारने देशाचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प मागी अर्थसंकल्पापेक्षा तीन लाख कोटींनी जास्त आहे. या अर्थसंकल्पामुळे अर्थसंकल्पामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणा आहे. मात्र आमच्या विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे असं खासदार नारायण राणेंनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. भाजपा खासदार नारायण राणेंनी ( Narayan Rane ) आज मुंबईतल्या नरिमन पॉईंट या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधी अज्ञानी असल्याचीही टीका केली.

काय म्हणाले नारायण राणे?

“उद्धव ठाकरेंना चांगल्या भाषेत बोलता येत नाही. त्यांच्या काळातलं बजेटही माझ्याकडे आहे. त्यांनी काय दिवे लावले ते समजलं आहे. आत्ता साडेचार लाख कोटींचं बजेट राज्याकडे आहे. यांना त्यावेळी कळलं का किती तूट आहे? मोदी सरकारचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. उद्धव ठाकरेंना बजेट वाचायचं असेल तर मी टिपण देईन. अज्ञानी राहुल गांधी बजेटवर बोलले, आम्ही बजेट मांडून लोकांना फायदा करुन दिला. तुम्ही तर राकोषीय तूट वाढवून दाखवली.” असा टोला नारायण राणेंनी ( Narayan Rane ) लगावला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्यासह प्रमुख विरोधकांनी हा अर्थसंकल्प देशासाठी हितकारक नाही म्हटलं आहे. या सगळ्यांना आज नारायण राणेंनी ( Narayan Rane ) उत्तर दिलं.

हे पण वाचा- Narayan Rane in Loksabha: शपथ घेल्यानंतर नारायण राणे माघारी का फिरले? नेमकं काय घडलं?

देवेंद्र फडणवीस यांच्यामागे भाजपा आहे

देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या टीका होताना दिसते आहे. अनिल देशमुख, श्याम मानव, संजय राऊत यांनी त्यांच्यावर आरोप केले. त्याबाबत नारायण राणेंना विचारलं असता, “देवेंद्र फडणवीस यांच्यामागे भाजपा आहे. ते एकटे नाहीत, जे कुणीही त्यांच्यावर टीका करत आहे त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे. मनोज जरांगेंचं मत हे काही मराठा समाजाचं मत नाही. त्यांच्यामागेही दुसऱ्या कुणाचीतरी ताकद आहे” असंही नारायण राणेंनी ( Narayan Rane ) म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
narayan rane On uddhav thackeray
नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. (फोटो- संग्रहित छायाचित्र)

राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत

राज ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केली त्याबाबत विचारलं असता, नारायण राणे म्हणाले, ” राज ठाकरेंनी जो स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो.” असं नारायण राणे म्हणाले.