भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे रविवारी दुपारी नांदेडहून विजापूरकडे विमानाने जाताना सोलापूरच्या विमानतळावर दहा मिनिटे थांबले. या वेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शरद बनसोडे यांनी मोदी यांना भेटून सोलापुरात प्रचारसभेसाठी येण्याचे आमंत्रण दिले. परंतु त्यास मोदी यांनी प्रतिसाद न दिल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली.
विमानतळावर बनसोडे यांच्यासह आमदार विजय देशमुख व आमदार सिद्रामप्पा पाटील आदींनी मोदी यांचे स्वागत केले. या वेळी कुणाशीही अधिक वेळ संवाद न साधता मोदी घाईगडबडीने हेलिकॉप्टरने विजापूरकडे रवाना झाले.