खासदार नवनीत राणा या बनावट जातप्रमाणपत्र सादर करून अमरावतीची लोकसभा निवडणूक लढल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द करावं असा निर्णय दिला आहे. परंतु, या निर्णयाला राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्‍हान देणाऱ्या राणा यांच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या जातप्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे राणा यांच्या उमेदवारीसमोर अडचणी येत होत्या. त्याचबरोबर नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार याबाबत संभ्रमाचं वातावरण होतं. मागील लोकसभा निवडणुकीत (२०१९) नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे तेव्हाचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. यावेळी नवनीत राणा या भाजपाच्या तिकीटावर अमरावतीची लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना शिवसेनेकडून आणि भाजपाच्या इतर मित्रपक्षांकडून विरोध होत आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. अखेर पक्ष आणि एनडीएतील मित्रपक्षांचा विरोध जुगारून भाजपाने नवनीत राणा यांना अमरावतीतून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. भाजपाने लोकसभा उमेदवारांची सातवी जादी जाहीर केली असून यामध्ये नवनीत राणा यांचं नाव आहे.

नवनीत कौर राणा यांना अमरावतीत शिवसेनेकडून विरोध होत होता. तसेच येथील माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीदेखील राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. राणा यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका अडसूळ यांनी घेतली होती. अमरावतीमधील एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या प्रहार जशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू यांचाही राणा यांना विरोध आहे. अशा परिस्थितीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं. परंतु, भाजपाने राणा यांना अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपाने काही वेळापूर्वी लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावतीतून नवनीत राणा यांना तर कर्नाटकच्या चित्रदूर्गमधून गोविंद करजोल यांना उमेदवारी दिली आहे.

Vishwajeet Kadam vishal patil kc venugopal
सांगली लोकसभेसाठी विश्वजीत कदमांनी ठोकला शड्डू; पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर म्हणाले, “शेवटचा पर्याय म्हणून आम्ही…”
ravi rana bachchu kadu
“बच्चू कडूंसमोर हात जोडून विनंती करतो…”, पत्नीला लोकसभेची उमेदवारी मिळताच रवी राणा नरमले?
hardik Pandya
हार्दिक पांड्याची ‘ती’ चूक अन् मुंबईने सामना गमावला; माजी क्रिकेटपटूंनी मुंबईच्या कर्णधाराला झापलं
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

भाजपासमोर अडसूळ आणि बच्चू कडूंच्या मनधरणीचं आव्हान

बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ते म्हणाले, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ज्या नवनीत राणाने आम्हाला अपमानित केलं त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही. कार्यकर्त्यांची मानसिकताच नाही. राजकारणात झीरो झालो तरीही चालेल पण इतकी शरणागती पत्करणार नाही. काहीही झालं तरीही राणांचा प्रचार करायचा नाही ही कार्यकर्त्यांची मानसिकता आहे.

हे ही वाचा >> “मला खात्री आहे, ती माणसं…”, प्रचारावेळी राडा करणाऱ्यांबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य; मनोज जरांगेंचा उल्लेख करत म्हणाल्या…

नवनीत राणांची राजकीय वाटचाल

नवनीत कौर-राणा या चित्रपट अभिनेत्री होत्‍या. यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍याशी २०११ मध्‍ये विवाह केला. त्‍यानंतर त्‍यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. २०१४ च्‍या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या उमेदवारीवर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, त्‍यावेळी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी राणा यांचा तब्बल १ लाख ३७ हजार मतांनी पराभव केला होता. राणांच्‍या जात प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्‍हणून निवडणूक लढवली. त्‍यांच्‍या उमेदवारीला कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीने पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत त्यांनी अडसूळ यांचा ३७ हजार मतांनी पराभव केला होता.