भाजपाच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे या सध्या जिल्ह्यात त्यांचा प्रचार करत आहेत. पंकजा मुंडे यांनी आज (२७ मार्च) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात प्रचारास सुरुवात केली. यावेळी काही मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांची गाडी अडवली, त्यांच्या गाडीसमोर काळे झेंडे दाखवले, यासह ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजीदेखील केली. दरम्यान, पोलिसांनी यावेळी आंदोलकांवर सौम्य लाठीहल्ला केला. पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. प्रचारावेळी झालेल्या या गोंधळाबाबत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच गोंधळ घालणारे आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी संबंधित नसावेत, असंही पंकजा म्हणाल्या.

पंकजा मुडे म्हणाल्या, काळे झेंडे दाखवणारे लोक फार नव्हते. चार-पाच जणच तिथे होते. त्यांच्याकडे काळे झेंडेदेखील नव्हते. त्यांनी खिशातून रुमाल काढून दाखवले. आसपासच्या गावात इतर नेत्यांनाही अशा प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. हे तरुण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळा झेंडा दाखवतायत. केवळ मलाच नाही तर इतर नेत्यांनाही काळे झेंडे दाखवत आहेत. मी पोलिसांना सांगितलं आहे की, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका. परंतु, काहींनी तिथे गोंधळ घातला, आरडाओरड सुरू केली. मला असं वाटतं की, ते रुमाल दाखवणारे चार-पाच लोक मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील आसावेत. परंतु, बाकीचे जे गोंधळ घालणारे लोक होते ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील असतील असं मला वाटत नाही. मला वाटतं ते सगळं राजकीय स्वार्थाच्या भावनेने सुरू होतं.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

यावेळी पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला की, मराठा आंदोलक तुम्हाला विरोध का करत आहेत? त्यावर माजी मंत्री म्हणाल्या, ते केवळ मलाच थोडी विरोध करतायत. इतरांनाही त्यांचा विरोध चालू आहे. तिथे इतर नेत्यांना मराठा आंदोलकांनी जाऊ दिलं का ते तपासा. ते समाजातील सर्वच नेत्यांचा विरोध करत आहेत. बाकीच्या जिल्ह्यांमधील प्रमुख नेत्यांनाही अशा विरोधाचा सामना करावा लागत आहे. मलाच विरो होतोय अशातला काही भाग नाही. केवळ मलाच विरोध होत असेल तर ते विरोधकांकडून जाणीवपूर्वक चालू असेल.

हे ही वाचा >> “मला राजकारणात हलक्यात घेऊ नका, अन्यथा…”, मनोज जरांगेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

पंकजा मुंडे म्हणाल्या, मला केवळ इतकंच वाटतं, की हे आंदोलन करत असताना कोणाचाही अवमान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. परंतु, मला खात्री आहे की, ती माणसं जरांगे पाटलांची नाहीत.