गेल्या दशकभरापासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी यामागची धारणा आहे. एकोपा आणि समानतेचा संदेश यातून दिला जातो. या नवरात्रौत्सवानिमित्त नवरंगांनुसार नेसलेल्या साड्या आणि ड्रेसमधील तुमचा फोटो ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या पेजवर तुम्हाला अपलोड करता येणार आहे. यासाठी खाली दिलेली पद्धत फॉलो करा :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही काढलेल्या फोटोची साइज ही दोन एमबीपेक्षा कमी असावी. JPG, JPEG आणि PNG या फॉरमेटमधीलच फोटो अपलोड करा. अपलोड करत असलेल्या फोटोचे नाव इंग्रजीमध्ये सेव्ह केलेले असावे. त्याखाली तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि ई-मेल आयडी लिहा.

फोटो अपलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर फॉर्ममध्ये खाली असलेल्या ‘कॅप्चा’वर क्लिक करुन नंतर ‘सबमिट’वर क्लिक करा. तुमचे फोटो तपासल्यानंतर ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या पेजवर प्रसिद्ध केले जातील. पेजवर प्रसिद्ध झालेले फोटो पाहण्यासाठी ‘सर्च’ ऑप्शनवर क्लिक करा. ‘सर्च’मध्ये तुमचा ई-मेल आयडी लिहून ‘सबमिट’ केल्यानंतर तुम्हाला तुमचे फोटो पाहता येतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri 2017 upload 9 days colours photos in marathi
First published on: 21-09-2017 at 11:46 IST