Ram Raksha Stotra Reading Benefits : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाला आणि तो दिवस आपण आता रामनवमी म्हणून अत्यंत उत्साहाने साजरा करतो. प्रभू श्रीराम हे अनेकांचे आराध्यदैवत असून, श्रीरामाला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक जण श्रीरामाची प्रार्थना वा पूजा करताना रामरक्षा स्तोत्र म्हणतात. रामरक्षा म्हणणे हे अत्यंत पुण्यदायी आणि लाभदायक असते, असेदेखील म्हटले जात असल्याची माहिती ‘अमर उजाला’च्या एका लेखावरून मिळते.

रामरक्षामध्ये प्रभू श्रीरामाची स्तुती करण्यात आली आहे. दररोज रामरक्षा म्हटल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, भक्तांची संकटांमधून सुटका होते, असे म्हटले जाते. थोडक्यात रामरक्षा म्हणणाऱ्या भक्तांचे प्रभू श्रीराम रक्षण करतात. रामरक्षाची निर्मिती कशी झाली, असा विचार करता, भगवान शंकरांनी बुद्धकौशिक ऋषींना स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना रामरक्षा सांगितली. बुद्धकौशिक ऋषी पहाटे उठल्यानंतर त्यांनी शंकर भगवानांनी सांगितलेली रामरक्षा लिहून ठेवली, असे मानण्यात येते. हे स्तोत्र संस्कृत भाषेत आहे. मात्र, रामरक्षाचे नेमके महत्त्व काय आणि हे स्तोत्र म्हणताना कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे ते पाहा.

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Ramnavami 17th April 2024 Panchang & Rashi Bhavishya
रामनवमी, १७ एप्रिल पंचांग: मेष- मीन, प्रभू श्रीराम कुणाला पावणार? कुणाच्या कुंडलीत प्रेम, पद, पैसे प्राप्तीचा योग?
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
Shani Vakri 2024
३६५ दिवस ‘या’ ४ राशींना शनिदेव करणार मालामाल? शनि जूनमध्ये वक्री अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती

रामरक्षा का म्हटली जाते?

रामरक्षा स्तोत्र हे एक संरक्षक कवच मानले जाते. त्यामुळे त्याचे दररोज पठण केल्याने भक्तांचे त्रास दूर होऊ शकतात. दररोज हे स्तोत्र म्हटल्याने व्यक्ती दीर्घायुषी होतो असे मानतात. तसेच व्यक्तीच्या आयुष्यात आनंद, यशप्राप्ती व नम्र स्वभाव, असे सकारात्मक बदल घडून येतात असादेखील अनेकांचा समज आहे. या स्तोत्राच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते; ज्यामुळे व्यक्तीचे कोणत्याही संकटापासून रक्षण होऊ शकते. इतकेच नव्हे, तर रामरक्षाचे दररोज पठण केल्याने मारुतीदेखील व्यक्तीवर प्रसन्न होतो, असे मानले जाते.

हेही वाचा : Ram Navami 2024 : रामनवमीच्या दिवशी पूजेसाठी २तास ३३ मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या तिथी, मुहूर्त वेळ व पूजा विधी

रामरक्षा म्हणताना कोणते नियम पाळावेत?

जर तुम्ही इच्छापूर्तीसाठी रामरक्षाचे पठण करणार असाल, तर त्यासाठी सलग ४१ दिवस अथवा दिवसातून ११ वेळा रामरक्षा म्हणावी. हा जप करताना प्रभू श्रीरामाचे स्मरण करावे. तसेच, त्यादरम्यान सर्व दुर्गुणांपासून दूर राहावे. स्वच्छ, शीतल रंगाचे धुतलेले कपडे परिधान करावेत, असे सांगितले जाते. यंदा उद्या बुधवारी (१७ एप्रिल) रामनवमी आहे.

[टीप – वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, याची कृपया नोंद घ्यावी.]