नृत्यांगणा गौतमी पाटील कारणांमुळे हल्ली चर्चेत असते. कधी ती तिच्या नृत्य करण्याच्या शैलीमुळे चर्चेत(बऱ्याचदा वादात) असते, तर कधी तिच्या नृत्यशैलीवर केलेल्या टीकेमुळे चर्चेत असते. गौतमी पाटीलनं तिच्यावर टीका करणाऱ्या राजकीय व्यक्ती किंवा इतर सेलिब्रिटींना दिलेल्या सडेतोड उत्तरामुळेही ती चर्चेत असते. पण आता गौतमी पाटील हे नाव थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या उल्लेखामुळे चर्चेत आलं आहे. शरद पवार हे आज अकोला दौऱ्यावर असून एका जाहीर कार्यक्रमात आपल्या भाषणात शरद पवारांनी गौतमी पाटीलचा उल्लेख केला. तसेच, तिच्या नृत्याबाबत भाष्य करताना शरद पवारांनी उपस्थितांना थेट प्रश्नही केला.

नेमकं काय घडलं?

शरद पवार अकोल्यात एका जाहीर सभेत बोलत असताना राज्य सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणावर भूमिका मांडत होते. यावेळी त्यांनी कंत्राटी पद्धतीने सरकारकडून भरती केली जात असल्यावर टीका केली. “नोकऱ्यांच्या बाबतीत सध्याच्या सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याची तयारी सरकारने केली आहे. इतरही क्षेत्रांत खासगीकरण वाढायला लागलं आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“शिवाजी एज्युकेशन सोसायटी ही उत्तर शिक्षण संस्था आहे. पण राज्य सरकारने जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळा खासगी कंपन्यांना दत्तक म्हणून द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ती कंपनी, कंपनीचे मालक शाळेच्या कामात हस्तक्षेप करतात. वैयक्तिक कामासाठी उपयोग करून घेतात, अशी शंका आली तर त्यात चुकीचं काही नाही”, अशा शब्दांत शरद पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली.

गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम

दरम्यान, शरद पवारांनी नाशिकमध्ये घडलेला एक प्रसंग सांगत असताना गौतमी पाटीलचा उल्लेख केला. “नाशिकमध्ये एक शाळा आहे. नाशिकमध्ये द्राक्षाचं मोठं पीक निघतं. द्राक्षापासून तिथे दारूही तयार केली जाते. दारू तयार करणाऱ्या एका कारखान्याला राज्य सरकारने एक सरकारी शाळा दत्तक म्हणून दिली. मद्य तयार करणाऱ्या कारखान्याला शाळा चालवायला दिली. शाळा कशी चालतीये याची मी माहिती घेतली. पण मला असं कळलं की ज्यांना ही शाळा चालवायला दिली आहे त्यांनी गेल्या महिन्यात त्या शाळेत एक कार्यक्रम आयोजित केला”, असं शरद पवार म्हणाले.

‘सबसे कातील गौतमी पाटील’ असं का म्हटलं जातं? गौतमीनेच दिलं उत्तर, म्हणाली…

हा कार्यक्रम कुणाचा होता, याचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले, “तो कार्यक्रम कुणाचा होता? तुम्हाला नाव माहिती आहे की नाही मला माहिती नाही. गौतमी पाटील. ऐकलंय का नाव? गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम त्या शाळेत ठेवला. आता तुम्ही सांगा, मुलांना काय शिकवायचं? गौतमीचा धडा शिकवायचा का मुलांना? आपण काय करतोय? कशा पद्धतीने करतोय? कुणासाठी करतोय? मुलांवर आपण काय संस्कार करतोय? याचा विचार त्यांच्या मनात नाहीये. खासगीकरण केलं जातंय थेट”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तो आदर्श कुठे आणि हे लोक कुठे”

“डॉ. पंजाबरावांनी ज्या प्रकारे शैक्षणिक संस्था उभ्या करून एक वेगळं चित्र समाजात तयार केलं. हा आदर्श कुठे आणि गौतमी पाटीलला नृत्यासाठी बोलवणारे आणि शाळा चालवणारे हे लोक कुठे याचा विचार करायला पाहिजे”, असंही शरद पवार म्हणाले.