राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांसह पक्षाच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. असं असलं तरी दोन्ही गटांकडून पक्षात फूट पडली नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पक्षात खरंच फूट पडली आहे का? याबाबत राजकीय नेत्यांसह कार्यकर्ते आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

अजित पवारांचं ‘एनडीए’मध्ये सामील होणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळेंनी ‘इंडिया’ आघाडीला साथ देणं, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही पर्याय राखून असल्याचं बोललं जात आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. याबाबत विचारलं असता शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा- “जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, “मला वाटत नाही की, माझ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. जे लोक भाजपाबरोबर गेले आहेत, ते माझ्या पार्टीचे राहिले नाहीत. माझ्या पक्षाचे कार्यकर्तेही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांचा आदरही करत नाहीत.”

हेही वाचा- “…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

भविष्यात भाजपाशी युती करण्याचा विचार असेल का? या प्रश्नावर शरद पवार पुढे म्हणाले की, असा प्रश्नच कसा काय विचारला जातो. हेच मला समजत नाही. मी गेल्या ५० ते ६० वर्षाहून अधिक काळापासून राजकारणात कार्यरत आहे. त्यामुळे भाजपाबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

हेही वाचा- २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात शरद पवारांचा हात? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर, याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला होता. २०१९ मध्ये भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचं सरकार स्थापन करण्याचा पर्याय शरद पवारांनीच सुचवला होता. पण सर्व वाटाघाटी झाल्यानंतर ऐनवेळी शरद पवारांनी माघार घेतली, असा दावा फडणवीसांनी केला. यावरही शरद पवारांनी उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचंही पवारांनी सांगितलं.