राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी फोन करुन धमकी देण्यात आली. २ डिसेंबरला ही धमकी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितलं. या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. ‘सिल्वर ओक’मधील टेलिफोन ऑपरेटरने याप्रकरणी ग्रामदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती सापडली असून पोलीस त्याची कसून चौकशी करत असं अजित पवारांनी दिली.

शरद पवारांना दिलेल्या धमकीबाबत अधिक माहिती देताना अजित पवार म्हणाले, “शरद पवारांचे स्वीय सहाय्यक राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे. शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती बाहेरच्या राज्यातील आहे. ती विकृत आहे की त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, याची चौकशी करण्याचं काम पोलीस करत आहेत. परंतु, त्यांचे फोन येते होते, ती व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. अतिशय खराब शब्द वापरत होती. दिवाळीत हे फार चालू होतं. तेव्हा तक्रार केल्यानंतर ही व्यक्ती सापडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचाळवीरांचं बोलणं थांबणार नाही- अजित पवार

महापुरुषांबाबत केलेल्या विधानांवर अजित पवार म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सातत्याने अपशब्द वापरण्याचे वाचाळवीरांचे काम थांबणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.