विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या कामकाजादरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सभागृहामध्ये प्रस्ताव मांडत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत जयंत पाटील यांच्या मागे बसलेले राष्ट्रवादीचे नेते आणि समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या हातवाऱ्यांमुळे चर्चेत आले होते. यावेळी धनंजय मुडे बॉम्ब कुठे आहे? अशी विचारणा करताना दिसत होते. यामुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. त्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

काय झालं होतं?

अधिवेशनात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे चार वर्षांचे वित्तीय अहवाल जयंत पाटील यांनी सादर केले होते. मात्र अहवाल मांडत असताना जयंत पाटलांच्या मागे बसलेले धनंजय मुंडे समोर बसलेल्या कोणाला तरी बॉम्ब कुठे आहेत? असं हातवारे करुन विचारताना दिसत होते. यावेळी ते गोल गोल हात फिरवत बॉम्ब, हात वर करुन स्फोट असे हावभाव करुन संवाद साधताना दिसत होते. नंतर ते स्वत:चे दंड थोपटून “इथे आहेत,” असं म्हणतानाची दृष्यं कॅमेरात कैद झाली होती.

Chhagan Bhujbal on Hemant Godse
नाशिकमधून छगन भुजबळ यांची माघार! पंतप्रधान मोदी-शाहांचे आभार मानत म्हणाले…
PM Narendra Modi And Govindam
‘कोणतंही हुकूमशाही सरकार फार काळ टिकू शकलं नाही, त्यामुळे भाजपाच्याही नशिबात तेच आहे’; कम्युनिस्टांचा दावा
Rahul Gandhi criticism of BJP as a repeat of the defeat of Shining India this year
‘शायनिंग इंडिया’ची यंदा पुनरावृत्ती, भाजपवर राहुल गांधी यांची टीका; भाजप आघाडीला १८० जागा मिळण्याचे भाकीत
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन

धनजंय मुंडेचं स्पष्टीकरण –

“जे काही तुम्ही पाहिलं तेच खरं आहे. स्पष्टपणे हातवारे सुरु होते. समोर विरोधी पक्षनेते बसले होते. बाहेर विधानभवन परिसरात तसंच काही पत्रकारांकडून आज काही बॉम्ब फोडणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. म्हणून मी सहज इशाऱ्यातून बॉम्ब फोडणार आहेत का? विचारत होतो. त्यांचं लक्ष नव्हतं…म्हणून एक दोनदा विचारलं. तर ते माझ्याकडे बोट दाखवत हो म्हणाले. मला वाटलं माझ्यासंबंधी आहे….तर मीदेखील तयारी आहे म्हटलं,” असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं.

पुढे ते म्हणाले की, “सूडपद्धतीने कारवाई केली जात असून त्यापद्धतीचं राजकारण केलं असून सरकार अस्थिर करण्यासाठी वाटेल ते करायचं, कोणालाच सोडायचं नाही, सर्व यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जात असताना अजून एक बॉम्ब फोडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पण तयार आहोत अशी भूमिका होती. ते मजेने बोललं गेलं आहे. सभागृहातील खेळीमेळीच्या वातावरणात सर्व काही झालं आहे”.

बॉम्ब प्रकरण काय?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांविरोधात खोटे गुन्हे रचून त्यांना अडकवण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून रचला जातोय असे गंभीर आरोप केले होते. हे आरोप करताना पुरावा म्हणून फडणवीसांनी विधानसभेमध्ये पेनड्राइव्ह आणि व्हिडीओ सादर केले होते. फडणवीसांच्या या व्हिडीओ बॉम्बनंतर राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लवकरच दुसरा बॉम्ब फुटेल असा सुचक इशारा दिला होता.

उद्या किंवा परवा आणखी एक व्हिडीओ बॉम्ब येणार असल्याचा दावा पाटील यांनी केला होता. “केंद्रीय तपास यंत्रणांकडून तुम्ही आम्हाला त्रास देता म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देतो असं सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ बॉम्ब टाकला. एका व्हिडीओ बॉम्बमुळे सगळं चिडीचूप झालंय. दुसरा व्हिडीओ उद्या-परवा येतोय. दुसरा व्हिडीओ तर खूपच स्ट्रँग आहे. फडणवीस यांच्या पाठीमागे पूर्ण भाजपा तसेच जनता आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.