राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात (Petrol and Diesel Price) करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. मात्र, त्या तुटपुंज्या आहेत. सरकार बदल्यानंतर आम्ही काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे, हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले.

इंधनकपातीवरून राज्यसरकावर टीका

”विरोधात असताना भाजपाने पेट्रोल आणि डिझेलवरील कर ५० टक्के कमी करा, अशी मागणी केली होती. मात्र, आता भाजपाचे सरकार आहे. मग त्यांनी कर ५० टक्के कमी का नाही केला”, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, ”जर इंधनावरील कर ५० टक्क्यांनी कमी केला असता तर, डिझेलची किंमत ११ रुपयांनी कमी झाली असती आणि पेट्रोलचे दर १७ ते १८ रुपयांनी कमी झाले असते. मात्र, सरकारने असे केली नाही”

“निर्णय घेण्याची वेळी आली की पळवाट काढायची”

विरोधीपक्षात असताना मागणी वेगळी करायची आणि निर्णय घेण्याची वेळी आली की पळवाट काढायची, असा खोचक टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे. आज ५ आणि ३ रुपयांनी दर कमी केले आहे. मात्र, केंद्र सरकार सातत्याने इंधनाच्या दरात वाढ करत आहे. गॅस सिलिंडरचे भाव देखील वाढले आहे. सरकार बदल्यानंतर आम्ही काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी केल्याने नागरिकांच्या रोजच्या जीवनात काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकारकडून इंधन दर कपातीचा निर्णय

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय सकाळी जाहीर केला होता. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक हा निर्णय घेण्यात आला होता.

हेही वाचा – Petrol Diesel Price : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल प्रतिलिटर ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त