करोना रुग्णांना उपचारात महत्त्वाचा असलेल्या ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. जीएसटी हटवल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण थोड्या प्रमाणात कमी होईल असं मतंही त्यांनी माडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द असोसिऐटेड चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेने अर्थमंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. त्याच पत्राचा आधार घेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोरोनाच्या संकटात भारतात औषध आणि आरोग्याशी संबंधित उपकरणांची कमतरता भासत आहे. अशावेळी ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसात लसींचा पुरवठा कमी होत असल्याने राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद होताना दिसत आहे. लसींच्या किंमतीनंतर आता त्यावर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर आक्षेप घेण्यात आला आहे. शुक्रवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून व्हॅक्सिन खरेदीवरील जीएसटी टॅक्स माफ करण्याची विनंती केली होती. त्या मागणीवरून आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान कर वसूल करण्यात मग्न असल्याची बोचरी टीका त्यांनी ट्वीटमधून केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jayant patil request to finance ministry to remove gst on oxygen rmt
First published on: 08-05-2021 at 20:16 IST