राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे दिलासा मिळाला. महादेव कोळी आणि कोळी महादेव या दोन्ही जाती एकच असून त्या आदिवासी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पिचड यांचे महादेव कोळी जातीचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले होते. तसेच त्यांना कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर येथील महाराष्ट्र आदिवासी मन्ना जमात मंडळाने मधुकर पिचड यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. पिचड यांच्या अनुसूचित जमात प्रमाणपत्रामुळे आदिवासी समाजाचे नुकसान झाल्याचा दावा राज्य आदिवासी मन्न जमात मंडळाने याचिकेत केला होता. पिचड हे कोळी महादेव जातीचे असताना त्यांनी महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते, असे आदिवासाी मन्ना जमातीने म्हटले होते. त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता न्यायालयाने महादेव कोळी आणि कोळी महादेव या दोन्ही जाती एकच असल्याचे स्पष्ट केल्यामुळे पिचड यांच्यासह तमाम महादेव कोळी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader madhukar pichad get relief from sc in caste certificate case
First published on: 03-01-2017 at 15:11 IST