भारतीय टेनिसपटू रोहण बोपण्णाने ४३ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावलं आहे. ४३व्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा बोपण्णा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. मॅथ्यू एब्डेनच्या साथीने रोहनने जेतेपदावर नाव कोरलं. यानंतर देशभरातून बोपण्णाच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडापडू, राजकारणी, सेलिब्रिटी बोपण्णाला शुभेच्छा देत आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या शुभेच्छा लक्षवेधी ठरल्या.

रोहन बोपण्णा ४३व्या वर्षी विजेता; ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीत अजिंक्य

Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
GT Team Captaincy came early Mohammed Shami on Shubman Gill
Gujarat Titans : “त्याला जबाबदारी लवकर मिळाली पण…”, शुबमन गिलच्या कर्णधारपदावर शमीची प्रतिक्रिया
Mohammad Muizzu
सैनिक नकोत पण कर्जमाफी हवी; मैत्रीचा हवाला देत मालदीवची भारताकडे याचना

रोहण बोपण्णाच्या वयाचा उल्लेख करून जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांशी त्याचा संबंध जोडला आहे. शरद पवार हे ८३ व्या वर्षीही राजकारणात सक्रीय आहेत. त्यांच्या वयाचा दाखला देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार बाजूला झाले आणि त्यांचा स्वतःचा गट स्थापन केला. काही नेते वयस्कर झाले तरी बाजूला होत नाहीत, तरूणांना संधी देत नाहीत, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. ज्याला शरद पवार यांनी स्वतःदेखील उत्तर दिलेले आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“भारताचा टेनिसपटू रोहण बोपण्णा याने मॅथ्यू एब्डेनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! रोहन बोपण्णा हे विजेतेपद पटकावणारा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. प्रतिभा आणि अनुभवाला वयाची मर्यादा नसते, हे त्याने आपल्या खेळातून दाखवून दिलंय. लक्षात असू द्या… खेळ असो वा राजकारण, वयाने फरक पडत नसतो. पात्रता महत्त्वाची असते”, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर टाकली आहे.

रोहण बोपण्णाला हटके शुभेच्छा देताना जितेंद्र आव्हाड यांनी एकप्रकारे अजित पवार गटावर निशाणा साधला. “खेळ असो वा राजकारण, वयाने फरक पडत नसतो. पात्रता महत्त्वाची असते”, हा उल्लेख करून त्यांनी अजित पवार गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला.

सर्वाधिक वयाचा टेनिसपटू

४३ व्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेणारा रोहन हा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला. याआधी हा विक्रम अमेरिकेच्या राजीव रामच्या नावावर होता. राजीवने ऑक्टोबर २०२२ रोजी ३८व्या वर्षी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होतं. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा रोहन हा केवळ चौथा भारतीय टेनिसपटू ठरणार आहे. याआधी लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनीच ही किमया केली आहे.