राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या भेटी घेताना चित्र पहायला मिळत आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही शिंदे यांची भेट घेतली आहे. रोहित पवार यांनीच या भेटीचे दोन फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत.

नक्की वाचा >> शिंदे गटाकडून शरद पवार, अजित पवारांवर का टीका केली जातेय?; रोहित पवार उत्तर देताना म्हणाले, “त्यांच्यावर खापर फोडलं तर…”

रोहित पवार यांनी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास केलेल्या ट्विटमधून या भेटीची माहिती दिली आहे. रोहित यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ते शिंदेंसोबत चर्चा करताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना रोहित यांनी, “मतदारसंघासह विविध विषयांवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज मुंबईत भेट घेऊन चर्चा केली.” असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “शिंदे-भाजपा सरकार म्हणू नका…”, ‘त्या’ प्रश्नावर चिडले मुनगंटीवार; घराणेशाहीवरुन टीका करत म्हणाले, “पक्ष कार्यकर्त्यांचा की…”

काही दिवसांपूर्वीच रोहित यांनी एकनाथ शिंदे हे मोठे नेते असल्याचं विधान एका विशेष मुलाखतीमध्ये केलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना २९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागला. या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या समर्थनाच्या आधारे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

नक्की पाहा >> Photos: “उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असे म्हटले जात आहे. पण मी म्हणतो एकही आमदार पडणार नाही. याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला, तर मी राजकारण सोडून निघून जाईन,” असे भाष्य एकनाथ शिंदे यांनी केल्यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना रोहित यांनी शिंदे यांच्या नेतृत्व गुणांबद्दल भाष्य केलं होतं. “एकनाथ शिंदे मोठे नेते आहेत. एखाद्या नेत्याला आपल्या लोकांना आत्मविश्वास द्यावाच लागतो,” असं म्हटलं. बंडखोर नेत्यांना विश्वास देण्याच्या हेतूने एकनाथ शिंदे यांनी एक जरी आमदार पडला तर राजकारण सोडेन असं म्हटल्यासारखं वाटतंय असं सूचित केलं.