देशातील तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोनाचे १७७ रुग्ण सापडले असून महाराष्ट्रातही करोनाग्रस्तांचा आकडा वाढून ४९ वर पोहोचला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार तसंच केंद्र सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जनजागृतीसाठी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.
“करोनाविरोधात लढताना प्रत्यक्षात एकत्र न येता सोशल मीडियातून एकत्र येऊ. लोकांमधील भीती दूर करून जागृती करण्यासाठी रोज सकाळी ९ वाजता कोरोनाबाबत जनजागृती करणारी बातमी/माहिती मी सोशल मीडियातून शेअर करणार आगे. तुम्हीही शेअर करा. मित्राने बनवलेला असाच एक व्हिडिओ मी शेअर करतोय,” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
कोरोनाविरोधात लढताना प्रत्यक्षात एकत्र न येता सोशल मीडियातून एकत्र येऊ. लोकांमधील भीती दूर करून जागृती करण्यासाठी रोज सकाळी 9वा. कोरोनाबाबत जनजागृती करणारी बातमी/माहिती मी सोशल मीडियातून शेअर करणार तुम्हीही शेअर करा. मित्राने बनवलेला असाच एक व्हिडिओ मी शेअर करतोय.#कोरोनाशी_लढूना pic.twitter.com/G1TYJprKlx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 19, 2020
रोहित पवार यांनी गाण्यांचं मॅशअप आपल्या ट्विटरवरून शेअर केलं आहे. यामध्ये करोनापासून वाचण्यासाठी त्यांनी १० उपाय सुचवले आहेत. प्रत्येक उपायाला त्यांनी गाणं किंवा एखाद्या जाहिरातीची जोड दिली आहे.