राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेड येथील आमदार रोहित पवार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. रोहित पवार सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टींबाबत व्यक्त होताना दिसतात. अनेकदा ते कुटुंबियांबरोबरचे फोटोही शेअर करतात. आज रोहित पवार यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

रोहित पवार यांनी पत्नी कुंती यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पत्नीबरोबरच्या काही खास क्षणांचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> “ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आणि…” रोहित पवारांना पत्नीचं कौतुक, म्हणाले… “माझ्यासारख्या व्यक्तीला…”

“पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर अनेक नात्यांना न्याय देणारी, प्रत्येकाच्या स्वभावाशी जुळवून घेणारी, आवडीनिवडी जपणारी, सर्वच जबाबदाऱ्या लिलया सांभाळणारी आणि खऱ्या अर्थाने माझं आयुष्य #बेटर करणारी #My_Better_Half सौ. कुंतीस लग्नाच्या तपपूर्ती वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!” असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. रोहित पवारांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवार यांनी पत्नी कुंती पवार यांच्याबद्दल अनेकदा मुलाखतीत भाष्य केलं आहे. पत्नीचं आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं होतं. रोहित पवार व कुंती यांना दोन मुले आहेत.