राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांचं राजकीय क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. ते सोशल मीडियावरही चांगलेचं सक्रीय असतात. रोहित पवार त्यांच्या कामाबद्दल, मतदारसंघातील लोकांबद्दल, आणि अन्य अनेक गोष्टींबाबत सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. शिवाय पत्नी कुंती पवार यांच्यासाठीही ते खास पोस्ट शेअर करत असतात. आता रोहित पवार यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या पत्नीचं कौतुक केलं आहे.

‘मराठी किडा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित पवार यांना त्यांच्या पत्नीबाबत प्रश्न विचारण्यात आला. “लग्न झाल्यानंतर असं कधी लक्षात आलं की, बायको नाही तर आपण काही नाही”. यावर रोहित पवार यांनी दिलेल्या उत्तरावर सगळ्यांची मनं जिंकली. त्यांनी आपल्या पत्नीबाबत दिलखुलासपणे भाष्य केलं.

आणखी वाचा – अक्षया देवधरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सुयश टिळकची झाली होती अशी अवस्था, खुलासा करत म्हणाला, “त्या परिस्थितीत…”

आणखी वाचा – “शेतीच करत राहिलो असतो तर…” ‘सैराट’नंतर तानाजी गालगुंडेने केली पायाची सर्जरी, म्हणाला, “माझे दोन्ही पाय…”

रोहित पवार म्हणाले, “असं अनेक वेळा वाटतं आणि रोज रोज वाटतं. असाही मला प्रश्न पडतो की, माझ्यासारख्या व्यक्तीला जो सातत्याने बाहेर असतो, कामात असतो त्याला माझी बायको कशी सांभाळते? एकतर ती गृहिणी आहे. ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. गृहिणी होणं काही सोपं नाही”.

आणखी वाचा – “तिच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आलं आणि…” एक्स गर्लफ्रेंड अक्षया देवधरबाबत सुयश टिळकचं भाष्य, म्हणाला, “आजही आमच्यामध्ये…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लाखो लोकांना सांभाळू शकतो. पण सुट्टीच्या दिवशी एक तास जरी मुलांना सांभाळायचं असेल तर कठीण होतं. पण ही ते काम नेहमी करते. अप्रत्यक्षपणे पत्नीला असं सांगायचं असतं की, हा जो वेळ आहे तो परत येणार नाही. तर मुलांकडे जरा लक्ष द्या. मुलांबरोबर चर्चा करा, गप्पा मारा”. त्यानंतर “ही बायकोची भीती म्हणायची का?” असं रोहित पवार यांना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, “आदरयुक्त भीती आहे. मी फक्त आदरयुक्त माझ्या बायकोलाच घाबरतो”. रोहित पवार आणि कुंती पवार यांच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.