राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक काही आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेससोबतच भाजपाकडून देखील या घटनेविषयी खंत व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना या घटनेविषयी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“नेता शहाणा नसला, तर त्याचा…”

शरद पवारांनी यावेळी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वावर निशाणा साधला. “याविषयी वेगळं काही बोलण्याची आवश्यकता नाही. आज इथे जे काही घडलं, त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याचं कारण नाही. नेता शहाणा नसला, तर कार्यकर्त्यांवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात. पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

“एसटी कर्मचाऱ्यांशी राष्ट्रवादीचे घनिष्ठ संबंध”

“एसटी कर्मचारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे घनिष्ठ संबंध आहेत. गेली ४०-५० वर्ष त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडून कधी चुकलेलं नाही. ज्या ज्या वेळी प्रश्न निर्माण झाले, तेव्हा ते सोडवण्यासाठी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी कष्ट घेतले. याच वेळेला एक चुकीचा रस्ता त्यांना दाखवला आणि त्याचे परिणाम आज इथे दिसत आहेत”, अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

“हे सहन केलं जाणार नाही, काही राजकीय पक्ष…”, गृहमंत्र्यांनी दिला इशारा, ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या आंदोलनाबाबत मांडली भूमिका!

“…म्हणून इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न”

दरम्यान, कर्मचाऱ्यांमधलं नैराश्य काढण्यासाठीच सिल्व्हर ओकवर अशा प्रकारे आंदोलन केल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. “कारण नसताना काही महिने घरदार सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्यामुळे प्रचंड आर्थिक संकट त्याच्या कुटुंबावर आलं. दुर्दैवानं काही व्यक्तींना आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे जे नेतृत्व अशी टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते, तेच नेतृत्व आत्महत्येसारख्या गोष्टीला जबाबदार आहे. त्यातून जे नैराश्य आलं, ते कुठेतरी काढलं पाहिजे, म्हणून त्यांनी या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यात दुसरं काहीही नाही”, असं शरद पवार म्हणाले.

ST Agitation : शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ बाहेर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; चप्पलफेक आणि जोरदार घोषणाबाजी

“आपण या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत. चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही. असा चुकीचा रस्ता कुणी दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणं ही आपली जबाबदारी आहे. थोडी माहिती तुम्हाला कळल्यानंतर तातडीने तुमच्यापैकी अनेक सहकारी इथे पोहोचले. संकट आलं तर आपण सगळे एक आहोत हे तुम्ही दाखववलं”, असं म्हणत शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.