राज्यात सध्या विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत असून जातीयवादाचं राजकारण केल्याचा आरोप करत आहेत. राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून उत्तरं दिली जात असताना सुप्रिया सुळे यांनीही यावर भाष्य केलं आहे. त्या ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

शरद पवारांवरील टीकेसंबंधी विचारण्यता आलं असता त्या म्हणाल्या की, “दगडं आंब्याच्या झाडावर मारली जातात. बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का? त्यामुळे लोकं उठसुट शरद पवारांवर जातीचे आरोप करतात”.

“शरद पवार नास्तिक आहे म्हटलं तर लागलं, पण सुप्रिया सुळेंनी…”, राज ठाकरेंचा पुन्हा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

राज ठाकरेंनी ४ मे चा अल्टिमेटम दिला असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. यावर मनसेच्या नेत्यांनी आक्षेप घेतला असल्यासंबंधी विचारलं असता त्या म्हणाल्या की, “या देशात कोर्ट आहे. ज्यांना वाटतंय की त्यांच्यावर अन्याय झालाय त्यांनी कोर्टात जावं”.

नवाब मलिक यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहोत. त्यांना चांगल्या डॉक्टरांची गरज असून आम्ही कोर्टात पाठपुरावा करत आहोत अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी; राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादीवर बरसले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“चीनचा मुद्दा महत्वाचा असून तो गांभीर्याने घेतला पाहिजे. मी गेले काही दिवस लोकसभेत युद्धावर बोलत होते. युद्ध हा तोडगा नाही असं आम्ही जे संसदेत विचार मांडले होते तेच पंतप्रधानांनी मांडले आहेत. युद्धात कोणी जिकंत नाही फक्त महिला विधवा होतात. ५६ इंच की छाती वगैरे फक्त भाषणापुरतं मर्यादित असतं. पण वास्वतापासून दूर असतं,” असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.