scorecardresearch

“महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भूमिका…”, नवाब मलिकांच्या अटकेवर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया!

नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यावर सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजपावर निशाणा साधला आहे.

supriya sule on nawab malik arrest
सुप्रिया सुळे यांची नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कांग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना आज ईडीनं अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांच्या घरी ईडीनं आज छापा टाकला होता. सकाळी ७ वाजल्यापासून छापा सुरू होता. अखेर दुपारी मलिक यांना अटक करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. यानंतर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर एबीपीशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “ते इतका अतिरेक करतील, हे जरा आश्चर्यकारक होतं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

“आम्ही छत्रपतीचे मावळे आहोत”

सुप्रिया सुळेंनी नवाब मलिक यांच्या अटकेवर आश्चर्य व्यक्त करतानाच आपण कुणासमोर झुकणार नसल्याचं म्हटलं आहे. “ते इतका अतिरेक करतील हे जरा आश्चर्यकारक होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भूमिका याआधी कुणी घेतली नव्हती. भाजपातले काही लोक सातत्याने ट्वीट करत होते की १५ दिवसांनी अटक होईल, छापे पडतील. ते खरं झालंय. कारण ईडी आणि भाजपा एकच आहे असा अर्थ आता काढावा लागेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Nawab Malik ED Inquiry live : दाऊद इब्राहिम कनेक्शन ; आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ‘ईडी’कडून अटक

“आम्ही पूर्ण ताकदीने लढू. सत्य नकीच जिंकेल. लोकांना त्रास द्यायचा, भीती दाखवायची असा हा प्रयोग आहे. पण आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणारही नाही. पूर्ण ताकदीने आम्ही नवाब मलिक यांच्यासोबत आहोत”, असं त्या म्हणाल्या.

Nawab Malik Arrest : “मला अटक झालीय, पण…”; अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया

“मी अमित शाहांना प्रांजळपणे विचारणार आहे की जेव्हा एखादा पेपर फुटतो, तेव्हा तुम्ही कायदेशीर कारवाई करता, पण ईडीचा पेपर फुटला, तर त्याचा न्याय कुणाकडे मागायचा?” असा टोला देखील त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp supriya sule reaction on nawab malik arrest ed raid inquiry targets bjp pmw